Sharad Mohol Sarkarnama
पुणे

Sharad Mohol Murder Case : 'मोहोळ खून प्रकरण; आरोपी मानकरने सिमकार्ड अन् पैसे पुरवले...

Sharad Moho Murder Case Update : शरद मोहोळ खून प्रकरणात तपास अधिकाऱ्यांची न्यायालयात माहिती

Chetan Zadpe

Pune News : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणामुळे पुणे शहरात खळबळ माजली होती. या प्रकरणी अनेक आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींनी खेड शिवापूर या भागात अभिजित मानकर मोबाईल सिमकार्ड आणि रोकड पैशांचा पुरवठा केल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे. तसेच, पोलिसांना या खूनासंबंधी मानकर याचे आरोपींसोबत झालेल्या रेकॉर्डिंग मिळाले आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी कोर्टात दिली. (Latest Marathi News)

शरद मोहोळचा खून करायला घटनास्थळी आलेले आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्या नेहमीत संपर्कात राहत होता. मानकर याला (3, रा. दत्तवाडी) याला पोलिस गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आले होते. आज बुधवारी त्याला न्यायालयात (ता. 7) कोर्टात हजर केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या गुन्ह्यात आत्तापर्यंत मानकरसह 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलचे क्लोन करण्यात आले असून, त्यात 19 हजार 827 ऑडिओ क्लिप, रेकॉर्डिंग मिळाले आहे. यातील 10 हजार क्लिपचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आहे. त्यात मानकर याचेही आरोपींबरोबरचे संभाषण समोर आले आहे. मानकर याच्या आवाजाचे नमुने लॅबला पाठवायचे आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढची साखळी समोर येण्याची शक्यता आहे, असे तांबे यांनी न्यायालयाला सांगितले.

आरोपीचा गुन्ह्याच्या कटातील सहभाग निष्पन्न झाला आहे. त्याच्या आवाजाची चाचणी अद्याप बाकी आहे. त्यासाठी आरोपाच्या पोलिस कोठडीची आवश्यक आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला.

मानकरला पोलिस कोठडी -

मानकरच्या आवाजाचे नमुने फाँरेन्सिक लॅबला पाठवायचे आहेत. त्यामुळे मानकर याला पोलिस कोठडी देण्याची मागणी तांबे यांनी न्यायालयाला केली. त्यानुसार विशेष न्यायाधीश (मोक्का) व्ही. आर. कचरे यांनी मानकरला 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT