Sharad Pawar Eknath Shinde  Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : विद्यार्थ्यांनी व्यथा मांडताच पवारांनी थेट मुख्यमंत्री शिंदेना लावला फोन!

Sharad Pawar : शिष्टमंडळाने घेतली पवारांची भेट घेतली.

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar : पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Examination) परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी आज (१३ जानेवारी) रस्त्यावर उतरले होते. अखेर तब्बल १८ तासानंतर आज पहाटे पुण्यातलं एमपीएससीच आंदोलन स्थगित करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेटीचं आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन स्थगित केलं होतं. मात्र यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे.

शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला आहे. एमपीएसी विद्यार्थ्यांच्या पाच जणांच्या शिष्टमंडळाने पवारांची भेट घेतली आहे. राज्यसेवा आयोगाच्या परिक्षा म्हणजेच एमपीएससीच्या प्रश्नाबाबत काही विद्यार्थी व परिक्षार्थींनी पुण्यात आंदोलन केले होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांतच्या भेटीसाठी वेळ मागितली होती.याच मुद्यावरून आता विद्यार्थ्यांनी पवारांची आज पुण्यात भेट घेतली.

यावेळी विद्यार्थ्यासमोर पवारांनी मुख्यमंत्र्याना फोन केला. राज्यसेवा आयोगाच्या परिक्षेबाबतचा तिढा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याच्या सूचना त्यांनी शिंदेंना केले. यावेळी आमदार राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT