Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : पुण्याच्या डीपीसी बैठकीला शरद पवारांची हजेरी : बैठकीत कुठल्याही विषयावर भाष्य नाही

त्यांनी आज अचानक बैठकीला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या (डीपीसी DPC) बैठकीला आज (ता. १९ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे वेळेआधीच ते बैठकीला पोचले होते. बैठक संपेपर्यंत ते बसून होते. मात्र, ते बैठकीत कोणत्याही विषयावर त्यांनी भाष्य केले नाही. गेली कित्येक वर्षे पवार हे कधीही डीपीसीच्या बैठकीला आलेले नाहीत. मात्र, त्यांनी आज अचानक बैठकीला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Sharad Pawar attended the Pune District Planning Committee meeting)

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात (Pune) आज जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक पार पडली. बैठकीस विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, आमदार दिलीप वळसे पाटील, दत्तात्रेय भरणे यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार, समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज अचानक हजेरी लावल्याने अनेकांना सुखद धक्का बसला.

पवारांच्या डीपीसीच्या बैठकीतील हजेरीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, मी अनेक वर्षे पुण्याचा पालकमंत्री होतो. मात्र, पवारसाहेब प्रथमच डीपीसीच्या बैठकीला आलेले मी पाहिले. ते का आले, ते मलाही माहिती नाही. खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं, तर त्या म्हणाल्या की, बैठक कशी चालते, हे बघायला आले असतील. पण, ते बैठकीत शेवटपर्यंत बसून होते. मात्र, त्यांनी फक्त ऐकण्याची भूमिका घेतली. ते बैठकीत जास्त काही बोलले नाहीत. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी मात्र आपापली भूमिका मांडली.

जिल्हा नियोजन समितीची बैठक ही दुपारी एक वाजता सुरू होणार होती. मात्र, पवार हे साडेबारा वाजताच आले होते. पवार यांनी डीपीसीच्या बैठकीला हजेरी लावण्याने कुतुहल निर्माण झाले आहे. बैठकीत येऊनही त्यांनी कुठल्याही विषयावर भाष्य केले नाही. त्यामुळे ते नेमके बैठकीला कशासाठी आले होते, अशी विचारणा राजकीय वर्तुळातून होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT