D.K. Shivakumar News: ‘माझ्या भावाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, हायकमांडच्या निर्णयावर समाधानी नाही’ : डीकेच्या खासदार भावाची प्रतिक्रिया

D. K. Suresh Statement: मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्याकडे सोपविण्यात आली असून डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले
DK Shivkumar-DK Suresh
DK Shivkumar-DK SureshSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडविण्यास काँग्रेस नेतृत्वाला यश आले असली तरी डी. के. शिवकुमार यांच्या गोटात अजूनही नाराजी असल्याचे लपून राहिले नाही. सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीनंतर शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लढाईत माघार घेतली असली तरी त्यांचे बंधू आणि खासदार डी. के. सुरेश यांनी याबाबत नापसंती व्यक्त केली. ‘माझ्या भावाला मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यामुळे या निर्णयावर आम्ही समाधानी नाही आहोत,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ('My brother wanted to be CM, not satisfied with High Command's decision': D. K. Suresh)

कर्नाटक (Karnataka) विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा (CM) वाट मिटविण्यात काँग्रेस (Congress) नेतृत्वाला यश आले आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्याकडे सोपविण्यात आली असून डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. या दोघांचा शपथविधी शनिवारी (ता. २० मे) होणार आहे. पण, काहींशा नाराजीच्या भावनेतूनच डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे दिसून येते.

DK Shivkumar-DK Suresh
Amol Mitkari News : अमोल मिटकरींनाही व्हायचंय खासदार : अकोल्यातून लढण्याची व्यक्त केली इच्छा

कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळविला होता. या विजयानंतर राज्यात सत्तास्थापनेलाही वेग आला होता. पण, मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? हा कळीचा मुद्दा कायम होता. सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोघांनी मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग केल्याने काँग्रेस हायकमांडची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. काँग्रेसश्रेष्ठींनी अखेर अनुभवी सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालतानाच शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

DK Shivkumar-DK Suresh
Pandharpur Bazar Samiti: वडिलांचा चिठ्ठीवर पराभव; पण मुलाची बिनविरोध बाजी : पंढरपूर बाजार समिती सभापतिपदी परिचारक समर्थक गायकवाड

डी. के. सुरेश यांची नाराजी

या नेतृत्वाच्या वादात पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी निर्णायक हस्तक्षेप करताना शिवकुमार यांना काहीशी माघार घ्यायला लावली. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची जबाबदारी देऊ केली आहे. पक्षाच्या हितासाठी आपण माघार घ्यायला तयार आहोत, असे आश्वासन शिवकुमार यांनी सोनियांना दिले. दुसरीकडे शिवकुमार यांचे बंधू आणि खासदार डी. के. सुरेश यांनी याबाबत नापसंती व्यक्त केली. माझ्या भावाला मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यामुळे या निर्णयावर आम्ही समाधानी नाही आहोत, असे ते म्हणाले.

DK Shivkumar-DK Suresh
Karnataka Politics : कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री फोन वापरतच नाहीत; सिद्धरामय्यांच्या काही ठळक गोष्टी..

शपथविधी सोहळ्याला विरोधकांचे पुन्हा शक्तीप्रदर्शन

दरम्यान, सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे शनिवारी शपथ घेतील. या वेळी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना यासाठी निमंत्रित केले जाणार आहेत.

DK Shivkumar-DK Suresh
Vinod Tawde News: भाजप हायकमांडचे विनोद तावडेंना पाठबळ; फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केले जाणार काय, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com