Pune Political News : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे हे वाहू लागले असून पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे असून आत्ता बारामती मधून भारतीय गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या शरद पवार यांना उमेदवारी दिल्याने आत्ता या रिक्षाचालक शरद पवार यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून शरद पवार यांच्यासहित पुणे जिल्ह्यात ४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.यात बारामतीमधून Baramati रिक्षाचालक शरद पवार यांना तर पुणे लोकसभा मतदार संघातून टेम्पो चालक मनोज वेताळ,मावळ मधून कॅब चालक संतोष वालगुडे आणि शिरूर मधून फूड डिलिव्हरी बॉय स्वप्नील लोंढे यांना उमेदवारी जाहीर झाली असून उमेदवारांच्या प्रचारार्थ १८ एप्रिल २४ रोजी प्रचार सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करून बारामतीच्या उमेदवार शरद पवार यांचा अर्ज भरण्यात येणार आहे.
याबाबत अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर म्हणाले, व्यवसायातील गीग वर्कर्स यांच्या मागण्यांबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने गांभीर्य न दाखवल्यामुळे, आम्ही मतदानाद्वारे आमचे आंदोलन मतपेटीतून पुढे नेत असून, या चार लोकसभा मतदार संघातील, ४ लाख गिग वर्कर्स व त्यांचे १६ लाख कुटुंबीय आमच्याच उमेदवारांना मतदान करून आमची ताकद आम्ही राजकीय पक्षांना दाखवून देऊ अस यावेळी ते म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुण्यातील Pune आंबेगाव बुद्रुक येथे शरद पवार हे राहत असून गेली 5 ते 6 वर्षापासून ते रिक्षा चालवत आहे.आत्ता ते बारामतीच्या रिंगणात उतरले असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सारखं त्यांचं नाव असल्याने त्यांची विशेष अशी चर्चा होऊ लागली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.