Satyajeet Tambe : विशाल पाटलांच्या बंडला सत्यजीत तांबेंची हवा; '...म्हणून उचलले पाऊल'

Vishal Patil Sangli Lok Sabha : वसंतदादा पाटलांचे या महाराष्ट्रावर आणि आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत. त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजीनियर तयार होत आहेत.
Vishal Patil, Satyajeet Tambe
Vishal Patil, Satyajeet TambeSarkarnama

Maharashtra Political News : महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेला आहे. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी तीव्र नाराज आहेत. ही जागा राखण्यासाठी त्यांनी दिल्लीला साकडं घातले होते, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. याची परिणिती विशाल पाटलांच्या बंडखोरीत झाला असून त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज केला आहे. पाटलांच्या या बंडाला पुर्वाश्रमीचे काँग्रेसनेते तथा विधान परिषदेचे सत्यजीत तांबेंनी हवा दिली आहे.

सत्यजीत तांबेंनी Satyaajeet Tambe ट्विट करून विशाल पाटलांच्या बंडाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, विशाल पाटलांवर काय अन्याय झाला, हे फक्त त्यांचा संघर्ष माहीत असलेल्या लोकांनाच समजेल. त्यातूनच त्यांना हे पाऊल उचलावे लागले. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत. वसंतदादा पाटलांचे या महाराष्ट्रावर आणि आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत. त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजीनियर तयार होत आहेत. त्यांचा हा वारसा विशाल हे पुढे घेऊन जाण्यात सक्षम आहेत. त्यामुळेच त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे, असेही तांबे म्हणाले.

दरम्यान, विशाल पाटलांच्या Vishal Patil बंडाचे महाविकास आघाडीतून टीका होत आहे. त्यांच्या बंडाबाबत काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, हा मतदारसंघ काँग्रेसला हवा होता. त्याबाबत स्थानिक पदाधिकारी विशेष आग्रही होते. वरिष्ठ पातळीवरही काँग्रेसने या जागेची मागणी केली होती. मात्र, शिवसेनेने या जागेचा आग्रह धरला. त्यामुळे सध्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आमची वारंवार चर्चा झाली. यातून मार्ग निघेल याबाबत आम्ही आशावादी आहोत. तसेच विशाल पाटील यांना पक्षाने एबी फॉर्म दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vishal Patil, Satyajeet Tambe
Sharad Pawar News : लेकीसाठी आठ, धैर्यशीलसाठी सहा, लाडक्या शशिकांतसाठी पाच; पवारांचा झंझावात!

विशाल पाटलांच्या बंडखोरीवर उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray सावध पवित्रा घेतला आहे. "महाविकास आघाडीचं जागावाटप आता झालेलं आहे. आघाडीतल्या तीनही पक्षांनी, सर्व मित्रपक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केलेलं आहे. जर आता बंडेखोरी आणि गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षांची जबाबदारी आहे की, ही बंडखोरी थांबवली पाहिजे. पण मला नाही वाटत आता बंडखोरी झाली तर जनता त्याला स्थान देईल," असे ठाकरे म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Vishal Patil, Satyajeet Tambe
Lok Sabha Election 2024: राज्यात धक्का कुणाला, युती की आघाडी? ओपिनियन पोलचा सर्वात मोठा कौल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com