Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar : मुख्यमंत्री पदाबाबत मोठं भाष्य; पवार म्हणाले, 'बहुमताला कोणताही अर्थ..' ...पाहा VIDEO

Sharad Pawar mahayuti Pune government chief minister : महायुतीची सत्ता स्थापनेला होत असलेला विलंब अन् मुख्यमंत्री पदावरून रंगलेले नाराजीनाट्यावर शरद पवार यांनी मोठे भाष्य केले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या आकड्यापेक्षा मोठा आकडा महायुतीकडे असताना देखील अद्याप सरकारला स्थापनेचा मुहूर्त मिळालेला नाही.

आधी मुख्यमंत्रीपदावरून आणि आता नंतर मंत्रिपदावरून महायुतीतील मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळाले. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

महायुतीला (Mahayuti) प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यामध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. असं असताना देखील मुख्यमंत्री पदाबाबत अद्यापही सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री हा भाजपचा होईल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल, असं जवळपास निश्चित मानलं जात असलं तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. यानंतर महाराष्ट्रात बैठक होऊन मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र मुंबईमध्ये होणारी ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आपल्या सातारा येथील मूळ गावी दोन दिवसासाठी निघून गेले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृह मंत्रालयासाठी आडून बसले असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. गृहमंत्री पद दिले तरच आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारू अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना काही अतिरिक्त मंत्रिपद देखील हवी आहे. मात्र ही मंत्री पद देण्यास भाजपचं नेतृत्व अनुकूल नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शपथविधी लांबला असल्यास चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या परिस्थितीवर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. आता या सर्व परिस्थितीवर आता शरद पवार यांनी देखील भाष्य केले आहे.

विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला असल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन सुरू केला आहे. त्या आंदोलनाला शरद पवार यांनी भेट दिली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, "महायुतीला इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही अशी परिस्थिती आहे. पाच तारखेला शपथविधी होणार होता. मात्र तो देखील आता होणार नाही असं वाचण्यात आल आहे. याचा स्वच्छ अर्थ आहे की लोकांचं मत, बहुमत याला कोणताही अर्थ नसून जे चाललं आहे, ते राज्याला अशोभनीय आहे".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT