Pune News: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम बाबत सातत्याने शंका उपस्थित करण्यात येत आहे.
आता महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील यंदाच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा संशय आहे. त्यामुळे पुण्यातील बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना ईव्हीएम विरोधातील पुरावे गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वबळाचा नारा देत 288 पैकी 125 जागा लढल्या मात्र मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आज त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. बैठकीमध्ये पराभवाच्या कारणांबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर मनसे नेते बाबू वागस्कर यांनी बैठकीबाबतची माहिती माध्यमांना दिली बाबू वागस्कर म्हणाले, आज झालेल्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला यादरम्यान अनेक उमेदवारांनी ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली. राज ठाकरे यांनी देखील ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पराभूत उमेदवारांना आणि पदाधिकाऱ्यांना ईव्हीएम संदर्भातील पुरावे गोळा करण्याच्या सूचना देण्यात आला आहे
राज ठाकरे यांच्याकडून राज्यभरात झालेल्या निवडणुकांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याच दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्रातील ही आढावा बैठक होती.काही उमेदवारांनी मतमोजणी मध्ये देखील फेरफार झाली असल्याचा आक्षेप घेतला आहे. संदर्भातील निवडणुकीदरम्यान आलेले सर्व अनुभव पराभूत उमेदवारांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडले. आगामी निवडणुकांमध्ये मनसे जोमाने लढणार असल्याचे देखील या बैठकीत निश्चित करण्यात आलं.
2014 मध्ये झालेल्या निवडणुकानंतर सर्वात प्रथम ईव्हीएम विरोधात आम्ही पुढे आलो होतो. इतर लोक याबाबत जास्त बोलत नव्हते मात्र आता ते सर्व लोक ईव्हीएम बाबत बोलत आहेत. त्यामुळे नक्की महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कशाप्रकारे ह्या गोष्ट हाताळली जाते याकडे मनसेचे लक्ष असेल.
राज्यभरातील ईव्हीएम विरोधात येणाऱ्या पुराव्याच्या आधारे नंतर एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरवण्यात येईल तूर्तास तरी ईव्हीएम विरोधात भूमिका घेणार नाही, असे देखील वागस्कर यांनी स्पष्ट केलं.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.