ShivSena Politics : 'गृहखात्यावर 'डॅशिंग' माणूस असावा अन् अर्थ खातं 'सक्षम' माणसाकडे..!', संजय शिरसाटांना सुचवायचंय तरी काय?

CM Eknath Shinde ShivSena party BJP NCP mahayuti MLA Sanjay Shirsat home and finance department : शिवसेना पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी गृहमंत्री आणि अर्थ खात्याबाबत भाष्य करून महायुतीवर सत्ता स्थापनेपूर्वी दबाव वाढवला आहे.
Sanjay Shirsat 1
Sanjay Shirsat 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना पक्षाचे प्रमुख तथा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा ते सातारा इथं दरे गावी जातात, असे वारंवार शिवसेनेचे प्रवक्ते आमदार शिरसाट सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडताना, गृहमंत्री पदावर दावा सांगितला आहे.

आता संजय शिरसाट यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत अर्थ खात्याचा उल्लेख आल्याने महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे टेन्शन वाढलं आहे. आमदार शिरसाट यांना मुख्यमंत्री शिंदेंचा हाच तर मोठा निर्णय, दबाव असल्याचे सुचवायचे, तर नाही ना, अशी चर्चा आता महायुतीत रंगली आहे.

संजय शिरसाट यांनी महायुतीच्या (Mahayuti) सत्ता स्थापनेबरोबरच, महाविकास आघाडी पराभवाचे खापर 'ईव्हीएम'वर फोडत असल्यांच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली. महायुतीत शिवसेना पक्षाचा मोठा सहभाग असेल, असे सांगताना, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेव्हा मोठा निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा ते सातारा इथल्या त्यांच्या मूळ दरे गावी जातात. तत्पूर्वी सरकार स्थापनेत कोणतीही अडचण नसेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याकडे संजय शिरसाट यांनी लक्ष वेधले. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणाला मुख्यमंत्री करावं हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घ्यायचा आहे. आता का वेळ लागतोय याची कल्पना नाही, असेही म्हणत संजय शिरसाट यांनी भाजपकडे बोट दाखवले.

Sanjay Shirsat 1
NCP Politics : अजितदादांचा आमदार भिडतोय खासदार लंकेंना, दबंगगिरी उपटून फेकणार

खाते वाटपावर भाष्य करताना संजय शिरसाट म्हणाले, परिवर्तन होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर खातेवाटपावर चर्चा होते. काही विद्वान सरकारवर टीका करत आहेत. ते अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, हे विसरलेत, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना लगावला.

Sanjay Shirsat 1
BJP Politics : शिंदेंची भाजपकडून आणखी कोंडी, चार मंत्र्यांच्या समावेशाला आक्षेप

जनतेने गद्दारांना लाचारांना त्यांची जागा दाखवली आहे. 40 लोकांनी उठाव केला आणि आमचे 57 लोक निवडून आले. हे दिल्लीकरांना किती फोन करायचे, शिंदेंना घेऊ नका, आम्ही येतो अशा विनवण्या केल्यात. त्याचा संपूर्ण रेकाॅर्ड आमच्याकडे आहे. घरका ना घाटका का, अशी अवस्था त्यांची झाली आहे. एकनाथ शिंदे लाचार नाहीत, सिल्व्हर ओकला मुजरा करणारे नाहीत. उलट महायुतीत समन्वयक प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी आली आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

गृहमंत्री डॅशिंग असावा...

संजय शिरसाट यांनी गृहमंत्री आणि अर्थ खात्यावर मोठं भाष्य केले. 'मुख्यमंत्री पदाच नाव जाहीर झाल्यानंतर इतर निर्णय घेतले जातील, असे सांगून मुख्यमंत्री पद भाजपकडे गेल्यानंतर गृहमंत्री पद आमच्याकडे असावा हा नैसर्गिक नियम आहे. या पदावर डॅशिंग नेता असावा', असे सांगून अर्थ खात्यावर देखील संजय शिरसाट यांनी अप्रत्यक्षपणे दावा केला.

अर्थ खात्याबाबत जुनी आठवण अन्...

'जे देतोय ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, ही शिंदे साहेबांची भूमिका आहे. लाडक्या बहीण योजना जाहीर करताना अर्थ खात्याने थोडा विरोध केला होता. ही आठवण सांगून अर्थ खात्यावर देखील डोळा असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. लाडकी बहीण योजनेचे 1500 ते 2100 करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मान्यता मिळाली हवी. त्यामुळे या खात्याचा कारभार देखील सक्षम माणसाकडे जायला हवा', असे म्हणत संजय शिरसाट यांनी अर्थ खात्यावर देखील अप्रत्यक्षपणे शिवसेनेचा दावा सांगितला.

शरद पवारांवर टीका

शरद पवार यांनी महायुतीला स्पष्ट बहुमत असताना सरकार स्थापनेला वेळ का लागतो आहे, अशी टीका केली होती. त्यावर संजय शिरसाट यांनी भाष्य करताना 2019 मध्ये सरकार स्थापन करायला 1 महिना लागला होता. याला जबाबदा कोण होतं? सकाळचा पथविधी विसरले का? ते पाप आठवा, असा टोला लगावत आठ दिवस उशिराने सरकार स्थापन झाल्यास काही आभाळ कोसळलं नाही. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आम्ही किंमत देत नाही, विरोधी पक्ष देखील राहिला नाही, ते त्यांनी समजावून घ्यावे, असे देखील संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com