Sharad Pawar, Prakash Ambedkar sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : प्रकाश आंबेडकरांची स्वबळाची तयारी, शरद पवार म्हणतात...

India Alliance News : 'वंचित'कडून बैठकी सुरू, 30 जागांवर लढणार निवडणूक?

Roshan More

Pune : 'इंडिया' आघाडीची बैठक दिल्लीत झाली. मात्र, या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत ठोस चर्चा झाली नाही. प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून आघाडीत समावेशाबाबत विचारणा केली होती. मात्र, आता कोणताच निर्णय होत नसल्याने आंबेडकर यांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी बैठकासुद्धा त्यांनी सुरू केल्या आहेत. लोकसभेच्या 30 जागांवर वंचित आघाडी निवडणुक लढण्याची शक्यता आहे. 'वंचित'च्या 'इंडिया' आघाडीत समावेशाबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. 'इंडिया' आघाडीची समन्वय बैठकीत झाली. आघाडीतील नेते, वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री तेथे होते. मी स्वतः प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या आघाडीतील समावेशाबाबत मल्लिकार्जुन खर्गे यांना सुचवले, असे शरद पवार म्हणाले. तर,विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे मत व्यक्त केले आहे.

'इंडिया' आघाडीत समावेशबाबत प्रतिसाद मिळत नसल्याने 'वंचित'चे नेते सुजय आंबेडकर यांनी थेट काँग्रेसला इशारा दिला होता. आमच्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले तर रडत येऊ नका, ठोकून काढू,असे सुजय म्हणाले होते. 'वंचित'चा 'इंडिया' आघाडीतील समावेशाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे 28 डिसेंबरनंतर निर्णय होईल, असे संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या तयारीत काँग्रेस नेते व्यग्र आहेत. मात्र, 28 डिसेंबरनंतर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचितचे नेते एकत्र बसून चर्चा करू. त्यामध्ये निर्णय होईल. हुकुमशाहीचे हात बळकट होतील, असे पाऊल प्रकाश आंबेडकर उचलणार नाही, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT