Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर ठरवणार लोकसभेचा 'रोडमॅप' ? राज्य कमिटीची तातडीची बैठक बोलावली

2024 Lok Sabha Elections : 'वंचित'च्या राज्य कमिटीची उद्या तातडीची बैठक, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार...
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोट बांधणीला सुरुवात केली आहे. यामध्ये एकीकडे 'इंडिया आघाडी' तर दुसरीकडे एनडीएतील (NDA) पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. याबरोबरच महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याचे सांगितले जात आहे.

या अनुषंगानेच आता 'वंचित बहुजन आघाडी' देखील अॅक्शन मोडवर आली असून प्रकाश आंबेडकर यांनी राज्य कमिटीची तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 26 डिसेंबरला होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar
BJP News: तीन राज्याच्या विधानसभा जिंकल्यानंतर भाजपचा पुढचा प्लॅन ठरला; नव्या मिशनची घोषणा

तसेच लोकसभेच्या 30 जागा लढवण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी या बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 'महाविकास आघाडी'बरोबर येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने अनेकदा इच्छा बोलून दाखवली. तसेच 'इंडिया आघाडी'सोबतही पत्र व्यवहार केला. मात्र, अद्याप वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aaghadi) कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी किती जागा लढवणार, याबाबत प्रकाश आंबेडकर हे या राज्य कमिटीच्या बैठकीत ठरवण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी 'अॅक्टिव्ह मोड'वर आली असून ठिकठिकाणी सभा, मेळावे घेण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे राज्य कमिटीच्या बैठकीत 'वंचित'ची आगामी रणनीती काय ठरती, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

आघाडीचा फॉर्म्युला ठरला ?

भाजपला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) जोरदार हालचाली करत असून आता आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ठाकरे गट- 20, शरद पवार गट- 10, काँग्रेस- 16 तर वंचित बहुजन आघाडी- 2, असा आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे.

मात्र, या फॉर्म्युल्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी राज्य कमिटीची तातडीची बैठक बोलावली असल्यामुळे ते काय भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Prakash Ambedkar
Prashant Kishor News : प्रशांत किशोर आंध्र प्रदेशच्या राजकारणात परतले, चंद्राबाबूंशी 3 तास चर्चा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com