Wadettiwar Vs Mitkari : विजय वडेट्टीवार हे तेव्हाच भाजपमध्ये जाणार होते...: अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट

Wadettiwar Criticized Ajit Pawar : चरणदास हा शब्दही कमी पडेल, असे त्यांचे त्यावेळचे वर्तन होते.
Vijay Wadettiwar-Amol Mitkari
Vijay Wadettiwar-Amol MitkariSarkarnama

Nagpur News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात विजय वडेट्टीवार यांची अवस्था ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, अशी झाली होती. वडेट्टीवार हे अजित पवार यांना चरणदास म्हणतात. पण, ‘मला भाजपमध्ये घ्या; म्हणून तुम्ही कोणाचे पाय चाटले, हे आम्हाला सांगायला लावू नका’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला. (Vijay Wadettiwar was going to join BJP : Amol Mitkari)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाह यांनी भेट घेतल्यानंतर त्यावर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. त्याला अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले. तुम्ही अजितदादांचा आणि वडेट्टीवार यांचा चेहरा पाहा. कोणाच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते आणि कोण महाराष्ट्राचा दादा आहे, हे सर्वांना माहीत आहे, असेही अमोल मिटकरी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Wadettiwar-Amol Mitkari
Supriya Sule News : सुप्रिया सुळे भाऊबीजेला काटेवाडीत अजित पवारांच्या घरी जाणार

ते म्हणाले की, अजित पवार यांची धमक हे महायुतीमध्ये गेल्यानंतरसुद्धा कायम आहे. सोशल इंजिनिअरिंग करून सर्वपक्षीय मंत्रिमंडळ बनवून अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून उत्तम कारभार पाहता आहेत. वडेट्टीवार यांचे नाचता येईना, अंगण वाकडे, असे झाले आहे. वडेट्टीवार हे बुद्धीभ्रष्ट झाल्याप्रमाणे आणि डोक्यावर पडल्यासारखं बोलायला लागले आहेत.

विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये जायला निघाले होते. त्यामुळे ते भाजपमध्ये जाऊ नयेत; म्हणून काँग्रेसने त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिले आहे. भाजपनेही त्यांना पक्षात घेण्यास नकार दिला होता. चरणदास हा शब्दही कमी पडेल, असे त्यांचे त्यावेळचे वर्तन होते. त्यांनी इथून पुढं अजितदादांवर बोलताना भान ठेवून बोलावं. नाहीतर आम्ही पण जशास तसे उत्तर द्यायला तयार आहोत, असा इशारा मिटकरी यांनी वडेट्टीवार यांना दिला.

Vijay Wadettiwar-Amol Mitkari
ShahajiBapu Patil News : शहाजीबापूंनी पुन्हा दंड थोपटले; ‘मला २०२४ मध्ये कोणाचेही आव्हान नाही’

काय म्हणाले होते वडेट्टीवार?

अजित पवार हे त्यांच्या मनाप्रमाणे झाले की खूष असतात. मनाविरुद्ध झाले की ते नाखूष असतात. कारण ज्याला नेहमीच ‘हम करेसो कायदा’ अशी त्यांची भूमिका आहे. तिजोरीची चावीच तुमच्याकडे आहे आणि तुम्ही दुसऱ्याकडे तक्रार काय करता. तुमची धमक आता दाखवा. महाविकास आघाडीत दाखवून तुम्ही सगळी तिजोरी साफ करत होता. आता ही धमक दादांनी दाखवावी. निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्याला रडविण्याची हिम्मत दाखवावी. दिल्लीचे चरणदास झालेले आपली दादागिरी दाखवू शकणार नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती.

Vijay Wadettiwar-Amol Mitkari
SugarCane Price Issue : राजू शेट्टींच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचा सतेज पाटलांनी सांगितला मार्ग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com