Sharad Pawar-Pradip Walse-Purva Walse Patil Sarkarnama
पुणे

Walse Patil : वळसे पाटलांच्या पुतण्याला शरद पवारांनी दिला 'हा' मोलाचा सल्ला!

तुमचे आजोबा दत्तात्रेय वळसे पाटील हे माझे जीवाभावाचे मित्र होते.

डी. के. वळसे पाटील

मंचर (जि. पुणे) : आजोबा सहकार महर्षी माजी आमदार (स्व.) दत्तात्रय वळसे पाटील आणि चुलते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा तुम्हाला वारसा लाभलेला आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे काम अधिक कार्यक्षमतेने करा. उसउत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत राहा. तुमच्यासारख्या युवकांना सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी चांगला वाव आहे, असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री वळसे पाटील यांचे पुतणे ॲड. प्रदीप वळसे पाटील यांना दिला. (Sharad Pawar gave this Advice to Pradip Walse, nephew of Dilip Walse Patil)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मुंबईत सोमवारी (ता. १२ डिसेंबर) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रदीप वळसे पाटील आणि माजी मंत्री वळसे पाटील यांच्या कन्या तथा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आजीव सदस्या पूर्वा वळसे पाटील यांनी आंबेगाव व शिरूर विधानसभा मतदार संघाच्या वतीने पवार यांना शुभेच्छा दिल्या. गर्दी असूनही पवार यांनी या दोघांशी चर्चा करत काही मोलाचा सल्ला दिला. गर्दीतही साहेबांचा सहवास लाभल्याने प्रदीप वळसे पाटील भारावून गेले होते. त्यावेळी पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पवार म्हणाले की, तुमचे आजोबा दत्तात्रेय वळसे पाटील हे माझे जीवाभावाचे मित्र होते. प्रत्येक वाढदिवसाला ते मला भेटून शुभेच्छा देत होते. समोरच्या व्यक्तीचे आदरतिथ्य कसे करावे. हा त्यांचा गुण वाखाणण्यासारखा होता. त्यांची ही परंपरा दिलीप वळसे पाटील यांच्याप्रमाणे प्रदीप व पूर्वा जपत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे.

दरम्यान तेथे उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भीमाशंकर कारखाना दररोज किती ऊस गाळप करतो?, ऊस कुठून आणता?, साखर साठा किती आहे?, वीजनिर्मिती किती होते? याबाबतची माहिती प्रदीप वळसे पाटील यांच्याकडून घेतली. या वेळी आंबेगाव तालुका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप लोखंडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT