Sharad Pawar, Rohit Pawar, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar On Rohit Pawar : साहेबांचाच रोहितला विरोध होता; अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट, नेमकं काय झालं होतं?

Baramati Lok Sabha Constituency : 2017 मध्ये राजेंद्र पवार यांनी मुलगा रोहितसाठी यांच्यासाठी तिकीट मागितले होते. राजूदादांची मागणी साहेबांना कळवली. साहेबांनी मात्र त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साथ सोडली असली तरी पवार कुटुंबातील इतर सदस्य मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबतच आहेत. आता लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार Sunetra Pawar आणि खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule अशी नणंद-भावजय लढत होत आहे.

या निवडणुकीत पवार कुटु्ंबातील सर्व सदस्य सुळे यांच्यासाठी प्रचार करताना दिसत आहे. आमदार रोहित पवार यांनी आपले काका अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते. मात्र, रोहित यांना राजकारणात येण्यास खु्द्द शरद पवारांचाच विरोध असल्याचा गौप्यस्फोट अजितदादांनी केला आहे.

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ कन्हेरी येथील मारुती मंदिरात फोडण्यात आला. त्यावेळी आयोजित सभेत अजित पवारांनी रोहित पवारांवर Rohit Pawar टीका केली. ते म्हणाले, 2017 मध्ये राजेंद्र पवार यांनी मुलगा रोहितसाठी यांच्यासाठी तिकीट मागितले होते. राजूदादांची मागणी साहेबांना कळवली. साहेबांनी मात्र त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. राजकारणात आणखी कुणी यायचे नाही. आपला बारामती अॅग्रो सांभाळा, असे त्यांनी सांगितले होते. राजूदादांनी जिल्हा परिषदेच्या त्या निवडणुकीत रोहित अपक्ष फॉर्म भरणार असल्याचे सांगितले. त्यावेळी एबी फॉर्म माझ्याकडेच होते. साहेबांना न सांगता मी रोहितला एबी फॉर्म दिला, असा गौप्यस्फोटच अजितदादांनी केला.

जिल्हा परिषदेनंतर रोहित पवार 2019 च्या विधानसभेसाठीही इच्छुक होते. यावर अजित पवार Ajit Pawar म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत खडकवासला येथून उभे राहायचे आहे, असे रोहितने सांगितले. कर्जत - जामखेडमध्ये माझे काम चांगले असल्याने त्याला तेथून प्रयत्न करण्यास सूचवले. तत्पूर्वी हडपसरमधूनही त्यांनी तिकीट मागितले होते. तेथून त्याचे सासरे मदत करतील, असे त्यांचे म्हणणे होते. याबाबत सविस्तर काय ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलेच आहे. आता मात्र हीच मंडळी साहेबांच्या जवळ बसून माझ्यावर टीका करत आहेत. मागील काही घटनांची अशा पद्धतीने उकल करत उपमुख्यमंत्री पवारांनी रोहित पवार यांच्या टीकेला उत्तर दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांवर Sharad Pawar टीका करताना अजित पवार म्हणाले, देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा कौल मिळत आहे. त्यामुळे आपणदेखील महायुतीचा खासदार येथून निवडून द्या. आता आमचीसुद्धा नरेंद्र मोदी यांच्यासोबत, तसेच आदानी - अंबानी या मोठमोठ्या लोकांबरोबर ओळख तयार व्हायला लागली आहे. यापूर्वी आम्ही फक्त राबत होतो, असा टोलाही उपमुख्यमंत्री पवारांनी विरोधकांना लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT