Sharad Pawar News : शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत चलबिचल होणार? विधानसभेचे गणित कसे ठरणार...

Loksabha Election 2024 : शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करत आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महाराष्ट्रात काय भूमिका असेल, यावर भाष्य केले. महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना 6 जागा मिळाल्या होत्या.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

Loksabha Electionः लोकसभेला आम्ही जाणीवपूर्वक कमी जागा घेतल्या. महाविकास आघाडीत आम्ही फक्त 10 जागा लढवत आहोत. आमचे लक्ष्य महाराष्ट्राची विधानसभा आहे. विधानसभा निवडणुकाला आम्ही जास्त जागा लढवणार आहोत. विधानसभेत आमच्या विचाराचे जास्तीत जास्त प्रतिनिधी असतील, असा आमचा प्रयत्न असेल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत चलबिचल होण्याची चिन्हे आहेत.

Sharad Pawar
Ajit Pawar News : कुणी रडतील, डोळ्यांत पाणी आणतील तुम्ही मात्र...; अजितदादांचा सुळे, पवारांना टोला

शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करत आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महाराष्ट्रात काय भूमिका असेल, यावर भाष्य केले. महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना 6 जागा मिळाल्या होत्या. यंदा महाविकास आघाडी सर्व जागा लढवत आहे. एक-दोन जागा वगळता सर्व ठिकाणी आमच्यामध्ये एकवाक्यता आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात 50 टक्क्यांपेक्षा जास्त यशाची अपेक्षा आहे.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात उन्हामुळे कमी मतदान झाल्याचे दिसते. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांच्या मतदारसंघातच कमी मतदान झाले, हेही लक्षात घ्यावे लागेल. यामागे लोकांची उदासीनता हेही एक कारण असू शकते, असे पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांच्या 'त्या' आरोपांना उत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तेलगी प्रकरण, दाऊद व भूखंडाचे श्रीखंड याचा संदर्भ देत शरद पवारांवरील आरोपांचा पुनरुच्चार केला. यासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी इतक्या वर्षांनंतर याची आठवण कशी झाली? आणि इतकी वर्षे तर ते माझ्याच नावाने निवडणूक लढवत होते. नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता.

यासंदर्भातदेखील शरद पवार म्हणाले, "यापूर्वीही सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँकेच्या संदर्भात मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले होते. आता त्यांनी हे आरोप कोणावर केले हे त्यांनी स्पष्ट करावे". चौकशी करण्यास आमची हरकत नाही. पण, ज्यांच्यावर हे आरोप केले जातात तेच आता त्यांच्याबरोबर आहेत, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

अमित शाहांना प्रत्युत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रासाठी शरद पवार यांनी काय केले, असा प्रश्न केला होता. त्यावर शरद पवार म्हणाले, "2014 ते 2024 या काळात ते सत्तेवर होते. आम्ही सत्तेवर नव्हतो. त्यामुळे सत्तेवर असलेल्यांनी आम्ही काय केले हे सांगायचे असते". सत्तेवर असताना आम्ही काय केले हे सर्व जगाला माहिती आहे, असे शरद पवार म्हणाले.

(Edited By Roshan More)

R

Sharad Pawar
Madha Loksabha : माढ्यात ट्विस्ट, धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारी अर्जावर हरकत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com