Nilam Gorhe Sarkarnama
पुणे

Ram Mandir Opening : मी आस्तिक म्हणून सांगते...; शरद पवारांना नीलम गोऱ्हेंचा सल्ला

Sharad Pawar Ram Mandir Neelam Gorhe Reaction : शरद पवारांच्या अयोध्या दर्शनाबाबतच्या भूमिकेवर नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

Sudesh Mitkar

Pune Politics Neelam Gorhe News :

अयोध्येत राम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले होते. मात्र आपण राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर दर्शनाला येणार असल्याचे शरद पवार यांनी कळवले आहे. यावर आता विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धर्म म्हणजे फक्त धर्म राहिलेला नाही, आपली सांस्कृतिक व्यवस्था ही धार्मिक पर्यटन म्हूणन आर्थिक व्यवस्था मोठी होत आहे. त्यामुळे देखील आपण याचे स्वागत केल पाहिजे. धार्मिक पर्यटन म्हणून आपण आयोध्याकडे पाहिले पाहिजे, असे पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी 23 जानेवारीला शिवसेना राज्यभरात कार्यक्रम घेणार आहे. तसे आदेश मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. सध्या मुख्यमंत्री 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणावरती काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने माझ्यावरती पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची जबाबदारी दिली आहे. मला राज्यस्तरावर कोणतीही जबाबदारी घ्यायची नव्हती. पण पक्षाने जबाबदारी दिली ती मान्य असल्याचे त्यांनी म्हटले.

राजू शेट्टी यांची जशी भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा झाली आहे. तशीच चर्चा उद्धव ठाकरे यांच्याशी झाल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून हातकणंगले मतदारसंघासाठी त्या ठिकाणचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव इच्छुक असल्याने त्यांना पक्षातून काढून टाकले आहे. मुरलीधर जाधव यांच्याशी संपर्क केला. तुमचे अश्रू महत्त्वाचे आहेत. स्वतःला सांभाळा, असे सांगितले. आता त्या जागे बाबत शिवसेना आणि भाजपचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सूरज चव्हाण यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईवरही त्या बोलल्या. सूरज चव्हाण यांचा विषय बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. कोविड काळात कंत्राटामध्ये ज्यांच्या सबंध होता त्यांना बोलावलं जातं आहे. महापत्रकार परिषद किंवा कोणाच्या जवळ असल्याने ही कारवाई झालेली नाही, असा दावा त्यांनी केला.

शरद पवार यांच्या राम मंदिर दर्शनाबाबतच्या पत्रावर नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली. दर्शनाला कधी जावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मंदिर पूर्ण झाल्यानंतर दर्शनाला जावं ही त्यांची इच्छा आहे. मात्र मी आस्तिक व्यक्ती म्हणून सांगेल की देव ठरवत असतो कोणाला कधी दर्शन द्यायचं ते. आत्ता मंदिर पूर्ण झालं नसलं तरी रामाने नरेंद्र मोदी यांना दर्शन द्यायचं ठरवलं आहे. शरद पवार यांना मंदिर पूर्ण झाल्यानंतर दर्शन घेता येईल. हे सर्व प्रभू राम ठरवतात, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT