Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : 'ईडी'च्या कारवाईची आकडेवारी शरद पवारांनी मांडली , म्हणाले...

Ed Enquiry : नेहरुंनी देशासाठी कष्ट केले. त्या परिवाराने देशासाठी त्याग केला. व्यक्तिगत हल्ले करण्यात शहाणपणाचे लक्षण नाही'

Roshan More

Political News : विरोधी पक्षातील नेत्यांना ईडीकडून टार्गेट केले जात आहे. सत्ताधारी पक्षाने ईडीचा वापर हा विरोधी पक्षातील नेत्यांना संपवण्यासाठी करत असल्याचा आरोप होत आहे. सरकारने ईडीचा गैरवापर कसा केला. किती जणांवर कारवाई झाली याची आकडेवारीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मांडत भाजपवर जोरदार हल्ला केला.

'ईडी' नवीन शब्द महाराष्ट्रातून देशाला माहीत झाला. ईडी शब्द हा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचला. ईडीचा गैरवापर किती झाला. विरोधी पक्षातील एक मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री, 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीच्या कारवाईमध्ये एकाही भाजप नेत्याचे नाव नाही. जे भाजपमध्ये सामील झाले त्यांची नावे थांबवण्यात आली. या अधिकाराचा गैरवापर लोकशाहीमध्ये त्यांच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर केला जातो, असा थेट हल्ला शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2015 ते 2023 या कालावधीत ईडीकडून सहा हजार केस रजिस्टर झाल्या. त्याची चौकशी केल्यानंतर अवघ्या 25 केसमध्ये काही सापडले. पण दोनच जणांना शिक्षा झाली. हा सगळ उपद्याप करण्यासाठी ईडीसाठी कोटी 404 कोटी रुपये खर्च खर्च केला. येवढा खर्च करून अवघ्या दोन जणांना शिक्षा, असा टोला देखील शरद पवार यांनी भाजपला (BJP)लगावला.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या आपल्या शेवटच्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्यावर व्यक्तिगत हल्ले केले. त्यांनी काय साधलं. नेहरुंनी देशासाठी कष्ट केले. त्या परिवाराने देशासाठी त्याग केला. व्यक्तिगत हल्ले करण्यात शहाणपणाचे लक्षण नाही', अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कान टोचले.

'तो' दावा चुकीचा

अजित पवार भाजप सोबत गेले आहेत. त्यांनी विकासाठी भाजपसोबत गेल्याचा दावा केला होता. त्यावर बोलताना 'काही लोक राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो असे सांगत आहेत. मात्र, हा दावा अजिबात सत्य नाही. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु होती. ती चौकशी सत्तेत गेल्यानंतर बंद झाली. त्यामुळे विकासाठी पक्ष सोडला, असे म्हणणे चूक आहे, असे शरद पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT