New Parliament Inauguration Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे आज उद्घाटन झाले. या उद्धघाटन सोहळ्यावर २१ विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. (Sharad Pawar slams CM Eknath Shinde over New Parliament Building)
याविषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधत जहरी टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला हाणला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
विरोधकांमध्ये आजच्या कार्यक्रमामुळे पोटदुखी सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 'विरोधकांना जनता जमालगोटा देईल,' असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.
"काही लोकांनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला," असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला होता.
एकनाथ शिंदे यांच्या जमालगोटा वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पवारांनी चांगलाच टोला लगावला. याबाबत पत्रकारांनी असता ते म्हणाले, "त्यांची भाषा त्यांनाच शोभते त्यावर बोलणं उचित नाही," "त्यांच्या बुद्धीला जे पटते, ते बोलतात," असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.
शरद पवारांनी संसद भवन उद्धघाटन सोहळ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पवार म्हणाले, " सध्या देशात जे काही सुरू आहे, ते लोकशाही विरोधी आहे. संसद भवन निर्मितीचा निर्णय घेताना आम्हाला विचारात घेण्यात आले नाही," हा सोहळा मर्यादित घटकांसाठीच होता की काय अशी शंका आहे, अशी टीका शरद पवारांनी यावेळी केली.
पण आम्हाला सांगितलं नाही...
"विरोधी पक्षातील सभासदांना निमंत्रण दिलं की नाही माहीत नाही. माझ्या हातात निमंत्रण आले नाही.पण माझ्या दिल्लीच्या घरी पाठवलं असेल तर मला माहित नाही. पण माझ्या हातात निमंत्रण आलं नाही. असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे की नाही हे सरकारने संसदेत मांडलं नाही.या प्रकल्पाबाबतची चर्चा मर्यादित लोकांशी केली असावी. पण आम्हाला सांगितलं नाही. इतकी मोठी गोष्ट करताना त्यांनी सर्वांना विचारात घ्यायला हवं होतं," असे पवार म्हणाले.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.