Sharad Pawar, Narendra Modi Sarkarnama
पुणे

Sharad Pawar On Modi Guaranty : 'मोदी गॅरंटी'ची शरद पवारांनी उडवली खिल्ली; म्हणाले...

Narendra Modi : समविचारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकत्र येत नागरिकांचे जनजागृती करण्याचे आवाहन

Chaitanya Machale

Pune Political News : केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करत विरोध करणाऱ्यांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात ठेवायचे, त्यांच्यावर दबाव टाकायचा अशी अनेक उदाहरणे सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारने सर्वांसमोर ठेवली आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन आपली मूठ घट्ट करण्याची गरज आहे. आज 'मोदी की गॅरंटी' असा प्रचार केला जात आहे. ही अशी गॅरंटी आहे की 'ज्यावर तारीखच नाही आणि त्याचा धनादेश वटतही नाही', अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडविली. (Sharad Pawar On Modi Guaranty)

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांना सत्तेतून यासाठी समविचारी पक्षांची सत्ता देशावर आणण्यासाठी महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट स्थापन करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघडीच्या कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा शनिवारी झाला. काँग्रेस भवन येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यामध्ये पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवार (Sharad Pawar) म्हणाले, गेल्या साठ-सत्तर वर्षात आपण अनेक राज्यकर्ते पाहिले. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांचेही सरकार पाहिले. मात्र गेल्या आठ ते दहा वर्षात मोदी यांची भूमिका देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्यांविषयी देशातील जनतेच्या मनात घृणा निर्माण करण्याचे काम करण्याची आहे. मोदी‌ हे सतत जवाहरलाल नेहरू व त्यांच्या कुटुंबावर हल्ले करत त्यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. नेहरूंनी देश प्रगतीच्या मार्गावर नेला हे संपूर्ण जग मान्य करते आहे, मात्र मोदी ते मान्य करत नाहीत.

राज्यकर्ते सामांन्यांचे हिताचे रक्षण करणारे आहेत, असे मला वाटत नाही. आम्ही शेतकऱ्यांचे सत्तर हजार कोटीचे‌ कर्ज माफ केले, आणि मोदी‌ सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकून पाहिला देखील तयार नाहीत. विरोधी विचारावर घाव घालण्याचे‌ काम मोदी सरकारकडून सुरू आहे. हे बदलण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी आपण सर्व समविचारी पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेमध्ये जाऊन त्यांना भविष्यातील संकटाची माहिती देत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), डॉ. अमोल कोल्हे, नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य चंद्रकांत हांडोरे, शिवसेना संपर्कनेते सचिन आहिर, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार संजय जगताप, रवींद्र धंगेकर, वंदना चव्हाण यांच्यासह इंडीया फ्रंटच्या विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT