Amol Mitkari On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी फुंकलेल्या तुतारीने अमोल मिटकरींचे हातही थरथरले...

Jitendra Awhad Blow Tutari at Raigad : तुतारी फुंकल्यानंतर आव्हाडांना द्यावयाच्या एक लाख रुपयांचा चेक लिहिताना मिटकरींनी केल्या गंभीर चुका
Amol Mitkari, Jitendra Awhad
Amol Mitkari, Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

राजकारण किती टोकाचे अनिश्चित असू शकते, हे अनुभवण्याचा सध्याचा काळ अत्यंत योग्य असा आहे. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी या काळाकडे बारकाईने लक्ष दिल्यास ते मोलाचे संशोधन होईल. 2019 पूर्वीची आणि त्यानंतरची राजकीय पक्षांची एकमेकांची टीका तपासून पाहिली आणि ते राजकीय पक्ष आता कुठे आहेत, हे पाहिले की पोट धरून हसायला येईल, अशी परिस्थिती आहे. (Amol Mitkari On Jitendra Awhad)

हे आज सांगण्यासाठी निमित्त आहे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचे. मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा पवार गट) प्रवक्ते आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सतत चर्चेत आहेत. एका गुन्हेगारावर कारवाई करू नये, यासाठी त्यांनी सभ्य भाषेत पोलिस अधीक्षकांशी केलेल्या संवादाची क्लिप नुकतीच व्हायरल झाली आहे. ते ज्या पक्षातून आमदार झाले, त्या पक्षात काही महिन्यांपूर्वी फूट पडली. मिटकरी यांनी सत्तेची वाट धरली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Mitkari, Jitendra Awhad
Bhandara Zilla Parishad : विनापरवानगी सीईओंची भेट शिक्षकाला भोवली

सत्तेत सामील न होता मागे राहिलेल्या त्यांच्या मूळ पक्षातील अन्य गटाला आता तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. त्या पक्षाचे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आहेत. मिटकरी यांनी आता शरद पवार यांच्या पक्षाच्या चिन्हाची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. तुतारीला खूप मार्केट आले आहे, असे वक्तव्य करत त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी फुंकून दाखवल्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले होते.

Amol Mitkari, Jitendra Awhad
Devendra Fadnavis : आता तुतारी कुठे वाजते, कशी वाजते ते समजेल; फडणवीसांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या तुतारी या चिन्हाचे आनावरण किल्ले रायगडावर झाले. मिटकरी यांचे आव्हान आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्वीकारले आणि त्या कार्यक्रमात त्यांनी तुतारी फुंकून दाखवली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मिटकरी यांनी एक लाख रुपयांचा चेक तयार असल्याचे प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले, मात्र, चेक लिहिताना त्यांनी चूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले. चेकवर ज्या ठिकाणी नाव लिहायचे असते तेथे त्यांनी रक्कम लिहिली आणि ज्या ठिकाणी रक्कम लिहायची असते तेथे चेक ज्यांना द्यायचा आहे त्यांचे म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचे नाव टाकले. त्यामुळे हा चेक वटणार नाही, अशीच शक्यता आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी किल्ले रायगडावर (Raigad) तुतारी फुंकली आणि त्याच्या आवाजाने तिकडे अमोल मिटकरी यांचे लक्ष विचालित झाले की काय, अशी चर्चा आता या प्रकारावरून सुरू झाली आहे. नाहीतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे पक्षचिन्ह मिळाल्यापासून त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी केलेल्या टीका-टिप्पणीमुळे तुतारी हे पक्षचिन्ह राज्यभरात पोहोचले आहे.

Amol Mitkari, Jitendra Awhad
Sharad Pawar : 'त्यांचं' आयुष्य दुसऱ्याचं घर फोडण्यात गेलं; रायगडावरून तुतारी फुंकताच पवारांवर भाजपचं टीकास्त्र

अमोल मिटकरी यांची वक्तृत्वशैली प्रभावी आहे. त्यांचे विविध भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. वर्षभरापूर्वीच्या अशाच एका व्हिडिओत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधत असल्याचे दिसत आहे. थोडासा शोध घेतल्यास महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांच्या नेत्यांच्या अशा गंमतीजमती मोठ्या संख्येने उपलब्घ होतील.

पिंपरी- चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे झालेल्या सभेचा हा व्हिडिओ आहे. शिवरायांच्या जयजयकाराचा आवाज तिकडे रोड शो करत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे, अन्यथा आपली पिंपरी- चिंचवडमधील दहशत काय कामाची?, असे त्या व्हिडिओत मिटकरी सांगत आहेत. पिंपरी- चिंचवड महापालिकेचे पाच वर्षांचे बजेट 22 हजार कोटींचे आणि स्मार्ट सिटीसाठी केंद्राने 1500 कोटी रुपये दिले आहेत.

महापालिकेने या पैशांचे नेमके काय केले, असा प्रश्न ते विचारत आहेत. 1500 कोटी रक्कम यांनी थोडी आणि त्यांनी थोडी वाटून घेतली, असा आरोप ते करत आहेत. आता मिटकरी त्या दोन्ही पक्षांसोबत सत्तेत आहेत. त्यांनी ते प्रश्न भाजप आणि शिवसेनेला (शिंदे गट) विचारले असतील का? याबाबत नागरिकांच्या मनात कुतूहल असेल का?, असे प्रश्न निर्माण होत आहेत.

ही अशी परिस्थिती केवळ अमोल मिटकरी आणि त्यांच्या पक्षापुरती मर्यादित आहे, असे नाही. आता जे पक्ष एकमेकांच्या विरोधात आणि सोबत आहेत, त्यांनी एकेकाळी आताच्या सहकारी पक्षांवर काय आणि कशी टीका केली होती, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांचा संधीसाधूपणा, दुटप्पीपणा त्यातून उघड होईल. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची सर्वच राजकीय पक्षांची तयारी असते, हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.

R

Amol Mitkari, Jitendra Awhad
Arvind Kejriwal ED : शरद पवारांचा अंदाज खरा ठरणार; केजरीवालांना अटकेची शक्यता, काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com