Sharad Pawar on Tilak Purskar Sohla Sarkarnama
पुणे

Sharad Pawar On Tilak Puraskar Sohla: मोदींच्या व्यासपीठावर पवार ; काँग्रेसला पोटदुखी शिवसेना नेत्यांना मळमळ

PM Narendra Modi- Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्याला जाण्यास विरोधी पक्षांच्या आघाडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विरोध केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देण्यापासून काँग्रेसने टोकाचा विरोध केला. ठाकरेंच्या शिवसेनेनेही मोदींच्या पुणे दौऱ्यावर नाराजीचा सूर ठेवला, यानिमित्ताने महाविकास आघाडी एकत्र येईल आणि मोदींना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराविरोधात एकवटले, असे संकेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या सोहळ्याला उपस्थित राहणारच आहेत. त्यावरून आता काँग्रेसला पोटदुखीचा त्रास होऊ लागला आहे, तर शिवसेना नेत्यांना मळमळ होण्याची शक्यता आहे. तरीही, पवार या पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर दिसतील

मंगळवारी दिल्ली सरकारसंबंधीचे विधेयक राज्यसभेत मांडणार आहेत. या विधेयकाला विरोध करण्यासाठी शरद पवारांनी मंगळवारी राज्यसभेत उपस्थित राहावं, अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. पण शरद पवार मात्र टिळक पुरस्काराला हजेरी लावणार आहेत. त्यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना पुरस्कार दिला जाणार आहे.

पण शरद पवारांनी त्या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी भूमिका विरोधी पक्षांच्या'इंडिया'मधील नेत्यांनी घेतली होती.पण शरद पवार मात्र त्या कार्यक्रमाला जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यानिमित्त पहाटे सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच, काही शाळांना सुट्टीही देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी सकाळी 10.30 वाजता पुणे विमानतळावर पोहोचतील.त्यानंतर ते 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन पूजा करतील.सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दुपारी 12.45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. शिवाजीनगर मैदानावर मोदींची सभा होणार आहे. यासोबतच पंतप्रधान मोदी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

पंतप्रधान मोदी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील आणि पूर्ण झालेल्या पुणे मेट्रो फेज 1 च्या दोन लाईनच्या सेवेचे उद्घाटन करतील. वाहनचालकांनी या मार्गांचा वापर टाळून इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही, अशी विनंती परिवहन विभागाकडून करण्यात आली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT