Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : अखेर ठरलं! शरद पवारांची तोफ दिलीप वळसेंच्या मतदारसंघात 'या' दिवशी धडाडणार

Dilip Walse Patil Manchar constituency : भुजबळ, मुंडेनंतर आता दिलीप वळसे आले शरद पवारांच्या रडारवर

उत्तम कुटे: सरकारनामा

NCP News : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवारांची साथ देऊन राज्यातील युती सरकारमध्ये सामील झालेल्या पक्ष नेत्यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेऊन त्यांची पोलखोल करण्यास शरद पवार यांनी सुरुवात केली होती. मात्र, या ना त्या कारणामुळे त्याला नंतर ब्रेक लागला.आता पुन्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सभा सुरु केल्या आहेत.

सात महिन्यांपूर्वी अत्यंत जवळचे असलेले राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी साथ सोडल्याचा मोठा धक्का शरद पवारांना बसला होता. त्यामुळे पक्ष फुटीनंतर अजित पवारांची साथ दिलेल्या वळसेंच्या शिरुर- आंबेगाव मतदारसंघातून ते या पोलखोल सभांना सुरुवात करणार होते. मात्र, तेथे ही सभा झाली नाही. त्याऐवजी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या येवला (जि.नाशिक) मतदारसंघात ती झाली. नंतर ती कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये त्यांनी ती घेतली. पण,जेथून ती सुरु होणार होती,त्या वळसेंच्या आंबेगावात ती झालीच नव्हती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वळसेंच्या मतदारसंघात त्यांच्या गावामध्ये मंचरला शरद पवार जाहीर सभा 21 फेब्रुवारीला घेऊन त्यांना आव्हान देणार आहेत. मंचर एसटी स्टॅंड समोरील चार एकराच्या मोकळ्या मैदानात दुपारी तीन वाजता सभा होणार आहे. त्यासाठीची तयारी सुरु झाल्याचे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी सरकारनामाला सांगितले.

30-35 हजाराची गर्दी या सभेला होईल,असा दावाही त्यांनी केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे हे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

खासदार कोल्हे यांना पुन्हा लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश स्वत: शरद पवारांनी दिले आहेत. त्यामुळे वळसेंना लक्ष्य करताना ते खासदार कोल्हेंच्या निवडणूक प्रचाराचा अप्रत्यक्ष नारळही त्यांच्या मतदारसंघातील या सभेत फोडतील, असा अंदाज आहे. दुसरीकडे आगामी लोकसभेला शिरुरसह पुणे जिल्हा हा बालेकिल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपल्या प्रतिष्ठेचा केला आहे.

खासदार कोल्हेंनी शरद पवारांना साथ दिल्याने ते पु्न्हा शिरुरमधून कसे निवडून येतात,ते पाहतोच असे खुले आव्हान नुकतेच त्यांनी दिले आहे. दुसरीकडे शिरुरमध्ये शरद पवारांचेही दौरे वाढले आहेत. महिन्याभरात ते दोनदा जु्न्नरला येऊन गेले. आता तिसऱ्यांदा ते येत आहेत. त्यातून त्यांनी अजित पवारांनी खासदार कोल्हेंना दिलेले चॅलेंज स्वीकारल्याचे दिसून आले आहे. त्यांनीही शिरुर मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असल्याला दुजोरा मिळाला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT