Ajit Pawar Baramati Visit : अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा; ‘...तर आमदारकीबाबत मी वेगळा निर्णय घेईन’

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला मत द्या; विधानसभेला अजितला मत द्या, असे तुम्हाला सांगितले जाईल.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना मत देऊ, तर लोकसभेला तिकडे (सुप्रिया सुळे) मत देऊ, असा विचार तुम्ही अजिबात मनात आणू नका. लोकसभा आणि विधानसभेलाही मलाच मत द्या. यदाकदाचित लोकसभेला मिठाचा खडा लागला, तर आमदारकीच्या बाबतही मी वेगळा निर्णय घेईन. मी कोणाच्या बापाचे ऐकायचो नाही, असा इशारा निर्वाणीचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीकरांना दिला. (...I will take a different decision regarding MLA : Ajit Pawar)

बारामतीत व्यापारी महासंघाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी निर्वाणीची भाषा वापरली. मात्र, बारामतीचे सर्व व्यापारी दादा आपल्या पाठीशी आहेत, असे व्यापारी महासंघाच्या वतीने सुशील सोमाणी यांनी सांगितले. (Ajit Pawar Baramati Visit)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
Ajit Pawar Solapur Tour : चंदनशिवेंच्या घरी जाणे अजितदादांनी का टाळले? राष्ट्रवादीतील गटबाजी ठरली वरचढ

गेल्या अनेक वर्षांपासून अथक परिश्रम घेऊनही माझ्या शब्दाला तुम्ही साथ देणार नसाल तर मी हे सर्व कशासाठी करायचे. एवढाच वेळ मी माझ्या व्यवसायाला दिला तर मी हेलिकॉप्टर आणि विमानातून फिरेन. मी जे काम करीत आहे, ते कोणीच करू शकणार नाही. कोणी कितीही दावे करू द्या, पण माझ्याएवढे काम करणार नाही, असा दावाही अजित पवार यांनी केला.

अजित पवार म्हणाले, आगामी काळात कोणी डोळ्यातून पाणी काढून जनतेला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. पण काम करणाऱ्याच्या पाठीशी राहायचे की भावनिक मुद्याला पाठिंबा द्यायचा, हे बारामतीकरांना चांगलेच ठावूक आहे. विकासाला गती द्यायची की खिळ घालायाचा, याचा निर्णय बारामतीकरांनी घ्यायचा आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला मत द्या; विधानसभेला अजितला मत द्या, असे तुम्हाला सांगितले जाईल. पण, तुम्ही ते डोक्यातही आणू नका. ते मला अजिबात चालणार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही माझ्याच विचाराला उमेदवाराला जनतेने निवडून द्यावे. उद्या खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर जर मिठाचा खडा लागला तर आमदारकीच्या बाबतही मी वेगळा विचार करेन. त्यावेळी मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Baramati Loksabha : शेवटची निवडणूक म्हणतील...भावनिक करतील; पण मी उभा केलेल्या उमेदवारालाच निवडून द्या; अजित पवार

पवार म्हणाले, अमित शहा यांना भेटायला मी आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीला गेलो होतो. तेव्हा प्रफुल्ल पटेल अमित शहा यांना म्हणाले होते, छत्तीसगढ जिंकून येणे अवघड आहे. तेव्हा अमित शहा म्हणाले होते, ‘लिखकर देता हूं....तीनही राज्ये येणार...इतका आत्मविश्वास त्यांना आहे. मी सरकारमध्ये असल्यामुळे बारामतीत विकास कामे होत आहेत. ही काही जादूची कांडी नाही, आपण व्यावहारिकच बोलले पाहिजे.

Ajit Pawar
Shirdi Lok Sabha : रामदास आठवलेंनी सांगितली शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळण्यातील तांत्रिक अडचण

बारामतीतून तुम्ही माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला तर विकास कामांसाठी मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगू शकतो. या लोकांनी आपल्या विचाराचा खासदार निवडून दिला आहे, त्यामुळे कोणाच्या पाठीशी उभे राहायचे, याचा निर्णय बारामतीच्या जनतेने घ्यावा, असे आवाहनही अजितदादांनी केले.

Edited by : Vijay Dudhale

Ajit Pawar
Ujani-Solapur Pipeline : ‘उजनी-सोलापूर पाईपलाईनसाठी 350 कोटी; अडथळे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com