Ajit Pawar, Sharad Pawar sarkarnama
पुणे

Sharad Pawar : भाजपच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी आघाडीनं आपला हुकमी पत्ता काढला; शरद पवार सभा घेणार

BJP vs MVA : प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीकडून भाजपला घेरण्यासाठी जोरदार तयारी...

सरकारनामा ब्यूरो

Kasba & Chinchwad By Election News : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा जोर शिगेला पोहचला आहे. भाजप आणि काँग्रेसनं कसबा आणि चिंचवड मतदारसंघामध्ये विजयासाठी कंबर कसली आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील दिग्गज नेत्यांची फौज प्रचारासाठी मैदानात उतरवली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही भाजपच्या प्रचाराला प्रत्युत्तर दिलं जात आहे. आता कसबा, चिंचवडमधील विजयासाठी महाविकास आघाडीनं आपला हुकमी पत्ता बाहेर काढला आहे.

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडमधील चिंचवड मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पोटनिवडणुकीत कसब्यात भाजप विरुद्ध काँग्रेस तर चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत आहे. या दोन्ही पोटनिवडणुका भाजपसह महाविकास आघाडीनं प्रतिष्ठेच्या करण्यात आल्या आहेत. याचमुळे भाजपकडून देवेंद्र फडणवीस,चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांच्यासह अनेक दिग्गज नेते पुण्यात तळ ठोकून आहे. तर महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात,आदित्य ठाकरे यांच्यासह विविध दिग्गज नेत्यांनी भाजपसमोर आव्हान उभं केलं आहे.

आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीनं भाजपला घेरण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी निवडणुकीतील तयारी, प्रचार यासंबंधी पवारांशी चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.

यानंतर कसबा पोटनिवडणुकीसाठी शरद पवार(Sharad Pawar) यांची सभा २२ तारखेला संध्याकाळी ४ ते ९ या वेळेत तर दुसरीकडे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी त्याचदिवशी पवार यांची सकाळी ११ वाजता सभा होणार आहे. पोटनिवडणुका जाहीर झाल्यापासून दोन्ही ठिकाणी अजित पवारांनी सूत्रे हातात घेतली आहे. त्यामुळे शरद पवारांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत जास्त लक्ष घातलेले नव्हते. उमेदवारांच्या मुलाखती, पदाधिकारी, कार्यकर्ते बैठका यांमध्ये अजित पवार यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे पवार यांनी निवडणुकीपासून स्वत: ला दूर ठेवले आहे.

कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शरद पवारांची भेट घेत प्रचारात सहभागी होण्याविषयी विनंती केली होती अशी माहिती समोर येत आहे. यानंतर आता कसबा, चिंचवडमध्ये पवारांची सभा होणार आहे. तसेच ते पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सात ते आठ छोटे मेळावे घेण्याचीही शक्यता आहे. पवारांच्या सभा, मेळाव्यामुळे महाविकास आघाडीला निश्चित फायदा होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT