Praveen Darekar
Praveen Darekar Sarkarnama

Praveen Darekar : सहकार क्षेत्राला पवार आणि शाहंच्या चर्चेतून दिशा मिळेल; दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

Pune News : ''सहकारी बँकांबाबत लवकरच राज्य सरकारला निवेदनही देणार...''
Published on

Pune Maha Conclave News :''शरद पवार यांचे सहकार क्षेत्राला मोठे योगदान राहिलेलं आहे. सहकाराला ते आशीर्वाद देत असतात. त्यांना यातील बारकावे माहीत आहेत. मी स्वतः 70 ते 80 सहकारी बँकांचा आढावा घेतला. तसेच प्रत्येक बँकेला अर्धा तास देऊन मी समजून घेत आहे. तसेच या सहकारी बँकांबाबत लवकरच राज्य सरकारला निवेदनही देणार आहे'', असं प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले.

''सहकाराची जाण अमित शाह यांनाही आहे. त्यामुळे शरद पवार आणि अमित शाह यांच्या चर्चेतून सहकाराला दिशा मिळेल. सहकार क्षेत्रात अनेक अडचणी आहेत, त्याला उर्जितावस्था देण्याची गरज आहे'', असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं. 'सकाळ'कडून महाकॉन्क्लेव्हचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज सहकार क्षेत्रावर चर्चा झाली. यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर बोलत होते.

Praveen Darekar
Mns News : पाठिंबा भाजपला अन् कार्यालयात स्वागत काँग्रेसच्या उमेदवाराचं,अखेर मनसेनं दिलं 'हे' स्पष्टीकरण

दरेकर म्हणाले, ''आज सहकारी बँकांसमोर अनेक अडचणी आहेत. बँका अडचणीत असल्यामुळे सरकारने त्यांना निधी द्यायला हवा. त्यामुळे बुडणाऱ्या बँका सुस्थितीत येऊ शकतात. सध्या सहकारी बँकांची आर्थिक उलाढाल ही कमी होत असल्याचे दिसते. पण काही बँका व्यक्तिगत ताकदीवर पुढे जात आहेत. मात्र, अडचणी आजही कायम आहेत'', असंही ते यावेळी म्हणाले.

Praveen Darekar
Sharad Pawar at Maha Conclave : कारखान्यांकडून तयार होणाऱ्या वीज खरेदीबाबत राज्य सरकारने धोरण ठरवायला हवं; पवारांची भूमिका

''सहकारावर मात करण्यासाठी एकत्रित पुढे जायला पाहिजे. अमित शाहांनी केंद्रामध्ये सहकार खात निर्माण केलं. त्यामुळे देशाच्या पातळीवर या विषयाला महत्व प्राप्त झालं आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्र सक्षम करण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवरच येत्या काळात आपण सहकार क्षेत्र अधिक सक्षम करूयात'', असं दरेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com