Sharad Pawar Sarkarnama
पुणे

MVA Seat Sharing Formula : शरद पवारांचे जागावाटपाबाबत मोठे संकेत; मविआचा तिढा 'या' तारखेला सुटणार

Sharad Pawar News : राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 28 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे.

Sachin Waghmare

Pune News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे लवकरच महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटणार असल्याचे स्पष्ट करीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्याची तारीखच सांगितली. त्यासोबतच राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे संख्याबळ आमच्या पक्षाकडे नाही. त्यामुळे ही निवडणूक लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नसल्याचे सांगितले.

महाविकास आघाडीतील घटक पक्षातील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे 9 ते 10 फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. बोलणी अंतिम टप्प्यात असून चर्चा पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतची अंतिम घोषणा करण्यात येणार असल्याची तयांनी यावेळी सांगितले.

MVA Seat Sharing Formula

'या' कारणामुळे राष्ट्रवादी राज्यसभा निवडणूक रिंगणात उतरणार नाही

राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी २8 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात कुठले पक्ष उतरणार याची चर्चा सुरु आहे. ज्यांच्याकडे निवडून येण्याइतपत संख्याबळ आहे. त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. आमच्याकडे राज्यसभा जागा लढवण्यासाठी संख्याबळ नाही. त्यामुळे राष्ट्रवादी ही निवडणूक लढणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले..

आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे सहा उमेदवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंडिया आघाडीतील फुटीवर बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, इंडिया आघाडीत असलेल्या नितीशकुमार (Nitishkumar) यांनी अचानक भूमिका का बदलली याची कल्पना नाही. त्यांनी भूमिका का बदलली हे मी सांगू शकत नाही. तर दुसरीकडे निवडणूक होऊ द्या. त्यानंतर एकत्रित बसू , अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली असल्याचे यावेळी शरद पवार म्हणाले.

SCROLL FOR NEXT