Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Video Sharad Pawar News : जनसंवाद सभेत शरद पवार यांचं मोठं विधान; म्हणाले, 'सहा महिन्यांत राज्यात आपले सरकार ...'

Ncp Politics News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता लागली असतानाच जनसंवाद सभेत माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठं विधान केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

विजय मोरे

Baramti News : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात सर्वाधिक जागा जिंकत मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता लागली असतानाच जनसंवाद सभेत माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठं विधान केले आहे.

शासकीय अधिकाऱ्यांना बोलवतो. त्यानंतर जे प्रश्न सुटतील ते सुटतील. ते ऐकतील असे वाटत नाही, जर त्यांनी ऐकलं नाही, तर सहा महिन्यात आपले सरकार असेल, त्यानंतर आपले सर्वच प्रश्न सुटतील, असेही शरद पवार (Sharad pawar) यांनी स्पष्ट केले. (Sharad Pawar News)

उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे आयोजित जनसवांद सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवा नेते युगेंद्र पवार (yugendra Pawar), राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगनाथ शेवाळे, सदाशिव सातव, सतीश खोमणे, तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप, वनिता बनकर, विठ्ठल जराड, सरपंच शोभा कांबळे, विनायक गवळी, अमोल गवळी, अक्षय गवळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

शरद पवार यांनी गुरुवारी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, उंडवडी सुपे, सुपे या गावांचा दौरा केला. यावेळी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्याचबरोबर त्यांनी गावातील अपूर्ण कामाची माहिती ग्रामस्थांकडून घेतली. त्यांचे प्रश्न समजावून घेतले.

जनतेने मतदानातून दाखवून दिले

या गावात मी अनेक वर्षातून आलो असलो तरी या गावातील लोकांनी एकत्र येऊन जो निर्णय घेतला आहे. तो सर्वांच्या समोर आहे, निवडणुकीच्या काळात लोक बोलत नव्हते. त्यावेळी आमचेही सहकारी चिंतेत असायचे पण मी त्यांना सांगायचं ते बोलत नसले तरी काम करतात आणि ते त्यांनी मतदानातून दाखवून दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतील सर्व अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. दूधाला सरकारने अनुदान देणे गरजेचे होते. मात्र, दूधाला दर नसल्यामुळे आणि अनुदान मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय अडचणीत आहे. कांद्याची निर्यात बंद असल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आला असून अनेक प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT