Sharad Pawar News Sarkarnama
पुणे

PCMC News : शरद पवार राष्ट्रवादीने भाजप अध्यक्षांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात ललकारले !

Youth Alliance Meeting News : राष्ट्रवादी कॉंग्रेस दुभंगल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अजित पवारांबरोबर गेले आहेत.

उत्तम कुटे

Pimpri-Chinchwad News : राष्ट्रवादी कॉंग्रेस दुभंगल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अजित पवारांबरोबर गेले आहेत. त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी उद्योगनगरीत नव्या दमाची यंग बिग्रेड उभारी घेत आहे. पिंपरी महापालिकेतील गत सत्ताधारी आणि भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांचा बालेकिल्ला असलेल्या सांगवीत ते रविवारी युवक मेळावा (ता.८) घेणार आहेत.

युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यात शेकडो युवक पक्षात प्रवेश करणार असल्याचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितले. पक्षफुटीनंतर पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय घडामोडी त्यातही शरद पवार (Sharad Pawar) गटात वेगाने घडत आहेत.

कार्यकारी समितीची निवड, विविध नियुक्त्या, पक्ष कार्यालय, रोहित पवार, जयंत पाटील यांचे वाढलेले दौरे, भटक्या विमुक्त समाजाच्या मेळाव्याला शरद पवारांची उपस्थिती, नव्या दमाच्या युवकांचे पक्ष प्रवेश यातून शरद पवार गट शहरात आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप (BJP) शहराध्यक्ष तसेच त्यांच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांचे होमपीच सांगवीतूनच ते उद्या महाराष्ट्राभिमान मेळाव्यातून रणशिंग फुंकणार आहेत.

महापालिकेच्या निवडणुकांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून मागील आठवड्यात काही ताकदीच्या युवकांचे प्रवेश घेण्यात आले. उद्याच्या मेळाव्यातही ते होणार आहे. तसेच जबाबदारी वाटपही केली जाणार आहे, अशी माहिती शेख यांनी दिली. युवकांच्या मागे पक्षातील ताकद उभे करण्यासाठी पक्षाकडे आग्रह धरणार आहे, असेही ते म्हणाले. या मेळाव्यानंतर पक्ष कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हस्ते पितृपक्ष संपल्यावर केले जाणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यात शरद पवारांचा मेळावा शहरात होणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT