Eknath Shinde-Devendra Fadnavis-Raju Shetti
Eknath Shinde-Devendra Fadnavis-Raju Shetti Sarkarnama
पुणे

'ते' दोन निर्णय बदलण्याचे धाडस शिंदे-फडणवीसांनीही दाखवले नाही : राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी

मिलिंद संगई

बारामती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार सत्तेवर येऊन शंभर दिवस उलटून गेल्यावरही उस उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतले जात नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. सध्या मी कोणत्याही पक्षाशी बांधिल नाही, कोणतेच सरकार उस उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेत नाही, असा आरोप त्यांनी केला. (Shinde-Fadnavis did not show courage to change those two decisions: Raju Shetti expresses displeasure)

बारामतीत पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, शिंदे व फडणवीस दोघांनाही भेटून त्यांना एफआरपी दोन तुकड्यात देण्याचा निर्णय बदलून एकाच वेळेस एफआरपी द्यावी, भूमी अधिग्रहण कायद्यात महाविकास आघाडी सरकारने बदल करत नुकसानभरपाई चौपट ऐवजी दुप्पट करत बाजारभावापेक्षा वीस टक्क्यांची कपात केल्याने शेतकऱ्यांना यामध्ये 72 टक्के रक्कम पूर्वीपेक्षा कमी मिळत असल्याने या कायद्यात बदल करावा, अशा दोन मागण्या केल्या होत्या. मात्र, या दोन्ही प्रश्नांना हात लावण्याचे धाडस दोघांनीही केले नाही.

गेल्या तीस वर्षांत सत्तेवर आलेल्या सर्व सरकारांनी ते साखर कारखानदारीला धार्जिण असल्याचे दाखवून दिले आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. एकीकडे पूर्वीच्या सरकारचे सगळे निर्णय शिंदे व फडणवीस सरकारने बदलले. मात्र, शेतकरीहिताचे हे दोन निर्णय काही बदलले नाहीत, अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखवली.

मी शेतकरी हिताची भूमिका सातत्याने घेतली. पण, सर्वच सरकारांमधून होणारे निर्णय शेतकरीहिताविरोधात असल्याने सध्या मी कोणत्याही पक्षाशी बांधिल नाही किंवा कोणालाही माझा पाठिंबाही नसल्याचेही शेट्टी यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT