मोठी बातमी : माजी मंत्री दिलीप सोपलांच्या बंगल्यावर स्फोटकं फेकली; बार्शीत खळबळ!

एका इसमाने गेटमधून दोन स्फोटके आतमध्ये टाकली. एका स्फोटामुळे गवत जळाले आहे, तर एक स्फोटक झाडाला धडकून खाली पडले.
Dilip Sopal
Dilip SopalSarkarnama

बार्शी (जि. सोलापूर) : माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्या बंगल्यासमोर, गेटवर, गेटच्या आतमध्ये भर दिवाळीत पाच जणांनी आदलीसारखी (दूरपर्यंत आवाज जातो) स्फोटके फोडली. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली. या प्रकरणी बार्शी (Barshi) शहर पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. (Explosives thrown at former minister Dilip Sopal's bungalow)

पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते, नीलेश मस्के, अंबादास रणझुंजारे, महेश पवार (सर्व रा. बार्शी, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी माजी मंत्री दिलीप सोपल यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली होती. सोपल यांनी २३ ऑक्टोबर रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. पण, ता. ३ नोव्हेंबर रोजी स्वतः पोलिस ठाण्यात हजर राहून स्फोटके फोडणाऱ्यांच्या नावांसह फिर्याद दिली आहे.

Dilip Sopal
राजन पाटील-प्रशांत परिचारकांनी धुडकावली महाडिकांची विनंती; अखेर ‘भीमा’ची निवडणूक लागली

फिर्यादीत सोपल यांनी म्हटले आहे की, मी, माझे बंधू, पुतण्या योगेश सोपल, नातू आर्यन असे एकत्र राहण्यास आहोत. ता. २३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान फटाक्यांचे मोठंमोठे आवाज होत असल्याने जागा झालो. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाहिले असता पाच जण आदलीसारखी स्फोटके उडवत होते. बंगल्याच्या दिशेने तोंड करून गेटला तसेच सुरक्षा रक्षकाच्या खोलीला आडवी स्फोटके जाऊन फुटल्याने नुकसान झाले आहे, त्यातील एका इसमाने गेटमधून दोन स्फोटके आतमध्ये टाकली. एका स्फोटामुळे गवत जळाले आहे, तर एक स्फोटक झाडाला धडकून खाली पडून विझल्याचे दिसून येत आहे. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.

Dilip Sopal
‘महिलांनी काय घालवं आणि कसं वागवं, हे भिडेंनी सांगू नये’ : प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

पोलिसांनी पंचनामा केला असून संगनमत करुन शांतता भंग केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बार्शीचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com