राजन पाटील-प्रशांत परिचारकांनी धुडकावली महाडिकांची विनंती; अखेर ‘भीमा’ची निवडणूक लागली

भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी आता भीमा शेतकरी विकास आघाडी विरुद्ध भीमा बचाव परिवर्तन आघाडी अशी दुरंगी लढत होत आहे.
Prashant Paricharak-Rajan Patil-Dhananjay Mahadik
Prashant Paricharak-Rajan Patil-Dhananjay MahadikSarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिंकदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची (Bhima Sugar Factory) पंचवार्षिक निवडणूक (Election) बिनविरोध करण्याचे आवाहन विरोधकांना विद्यमान अध्यक्ष तथा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केले होते. मात्र, माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) आणि माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी महाडिकांनी धुडकावून लावत भीमा बचाव परिवर्तन आघाडीच्या नावाखाली आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे भीमा कारखाना बिनविरोध न होता त्याची निवडणूक लागली आहे. (Election of Bhima Cooperative Sugar Factory has finally started)

भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी आता भीमा शेतकरी विकास आघाडी विरुद्ध भीमा बचाव परिवर्तन आघाडी अशी दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. भीमा कारखान्यासाठी येत्या १३ तारखेला मतदान होणार असून १४ तारखेला मतमोजणी होणार आहे.

Prashant Paricharak-Rajan Patil-Dhananjay Mahadik
‘महिलांनी काय घालवं आणि कसं वागवं, हे भिडेंनी सांगू नये’ : प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

खासदार धनंजय महाडिक यांनी निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन विरोधकांना केले होते. मात्र, विरोधकांनी ते अमान्य करीत निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. महाडिक यांनी निवडणुकीत आपल्या पॅनेलमधून सहा नवीन चेहरे दिले आहेत, उर्वरित जुने आहेत. त्यामुळे जुन्या नव्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न धनंजय महाडिक यांनी केला आहे.

Prashant Paricharak-Rajan Patil-Dhananjay Mahadik
शेतकरी संघटना सत्तेला चिकटली अन्‌ सत्व हरवून बसली!

दरम्यान, भीमा सहकारी साखर काखान्याच्या निवडणुकीत खासदार महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक हे पुळुज गटातून उभे आहेत, तर त्यांच्या विरोधात ‘भीमा बचाव’चे कारखान्याचे उपाध्यक्ष राहिलेले कल्याणराव पाटील उभे आहेत. कारखान्याचे सध्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण हे टाकळी सिकंदर गटातून उभे आहेत. संस्था प्रतिनिधी गटातून खासदार धनंजय महाडिक हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्या विरोधात भीमा बचावचे राजेंद्र आदिनाथ चव्हाण उभा आहेत.

Prashant Paricharak-Rajan Patil-Dhananjay Mahadik
आमदार प्रताप सरनाईकांना ईडीचा दणका; ११ कोटींची मालमत्ता जप्त करणार

सर्वांचे लक्ष असलेल्या कोन्हेरी गटातून सध्याचे संचालक राजेंद्र टेकळे यांना भीमा विकास आघाडीने पुन्हा संधी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात जनहित शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कुमार गोडसे उभा आहेत. भीमा बचाव आघाडीकडून पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांच्या पत्नी अर्चना घाडगे यांना संधी देण्यात आली आहे, तर त्याच गटातून भीमा विकास आघाडीतून सिंधू चंद्रसेन जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक यांनी गेल्या आठवड्यापासून ‘होम टू होम’ जाऊन सर्व वातावरण ढवळून काढले आहे. या निवडणुकीत काय होणार, हे येत्या १४ तारखेलाच समजणार आहे.

भीमा शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार पुढील प्रमाणे

पुळूज गट : विश्वराज धनंजय महाडिक, बिबीशन बाबा वाघ

टाकळी सिकंदर गट : सुनील रावसाहेब चव्हाण, संभाजी नामदेव कोकाटे

सुस्ते गट : संतोष चंद्रकांत सावंत, तात्यासाहेब चंद्रकांत नागटिळक

अंकोली गट : सतीश नरसिंग जगताप, गणपत महादेव पुदे

कोन्हेरी गट : राजेंद्र गोरख टेकळे,

महिला राखीव गट : सिंधू चंद्रसेन जाधव, प्रतीक्षा बाबूराव शिंदे

इतर मागासवर्गीय गट : अनिल आगतराव गवळी,

भटक्या विमुक्त जाती जमाती गट : सिद्राम ज्ञानोबा मदने

अनुसूचित जाती जमाती गट : बाळासाहेब बापू गवळी

संस्था प्रतिनिधी गट : खा धनंजय भीमराव महाडिक

भीमा बचाव परिवर्तन आघाडीचे उमेदवार

पुळुज गट : कल्याणराव आप्पाराव पाटील, देवानंद रावसाहेब गुंड

टाकळी सिकंदर गट : राजाराम दगडू माने, शिवाजी संदिपान भोसले

सुस्ते गट : पंकज मच्छिंद्र नायगुडे, विठ्ठल दत्तात्रेय रणदिवे

अंकोली गट : भारत गोविंद पवार, रघुनाथ नेमिनाथ सुरवसे

कोन्हेरी गट : कुमार महादेव गोडसे

महिला राखीव गट : सुहासिनी शिवाजी चव्हाण, अर्चना दिलीप घाडगे

अनुसूचित जाती जमाती गट : भारत सुदाम सुतकर

इतर मागास प्रवर्ग : राजाभाऊ कुंडलिक भंडारे

भटक्या विमुक्त जाती जमाती गट : राजू विठ्ठल गावडे

संस्था गट : राजेंद्र आदिनाथ चव्हाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com