कुरुळी (जि. पुणे) : शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार लोकहितासाठी नाही; तर बदला घेण्यासाठी आल्याचा घणाघाती आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदला घेण्याच्या त्या विधानाचा दाखला दिला. ज्यांच्याकडे लोकहित नसतं, ते कधीच आपला विचार करणार नाहीत, त्यामुळे येत्या २०२४ मध्ये महाराष्ट्रात बदल होणार, हे निश्चित, असेही पवार यांनी सांगितले. (Shinde-Fadnavis government is in power to take revenge : Rohit Pawar)
खेड तालुक्यातील निघोजे येथील विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार पवार आणि दिलीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात आमदार पवार बोलत होते.
आपले कुटुंब आणि महाराष्ट्रावर कोण बोलत असेल, तर आपण शांत का बसायचे, असा सवाल रोहित पवार यांनी केला. ‘भाजप नेते आणि राज्यपालांनी राज्यातील महापुरुष, संतांवर आक्षेपार्ह विधान केल्याची आठवण करुन देत भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी दुर्लक्ष केल्याची खंत रोहित पवारांनी व्यक्त केली. या लोकांना सत्ता स्वतःच्या हितासाठी आणि ४० आमदारांना खूष करण्यासाठी हवी होती, असाही आरोप पवारांनी केला.
मी पाठपुरावा करत मंजूर करून आणलेल्या पाणी पुरवठा कामाची सुरुवात करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील वेळ देत नाहीत. हे कामे करण्यासाठी पालकमंत्री झालेत का थांबविण्यासाठी झाले आहेत, हे मात्र कळत नाही. खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक परिसरातील १८ गावांसाठी १८० कोटींची पाणी पुरवठा योजना, विविध विकास कामे मी मंजूर केली, त्याची सुरुवात केली आहे.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, शांताराम सोनवणे, पोपटराव येळवंडे, स्वामी येळवंडे,सत्यवान येळवंडे,कैलास येळवंडे,धनाजी येळवंडे, सरपंच रमेश गायकवाड ,उपसरपंच सुनीता शिंदे, माजी उपसरपंच रुपाली येळवंडे ,सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येळवंडे आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.