Eknath Shinde News : कट्टर समर्थकांना फोडत मुख्यमंत्र्यांनी जितेंद्र आव्हाडांना दिला हा इशारा

ट्विटरवर काही क्लास नेते असले तरी हणमंत जगदाळे हे लोकांमधील नेते आहेत.
Eknath Shinde-Jitendra Awhad
Eknath Shinde-Jitendra AwhadSarkarnama

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा कळवा-मुंब्रा हा बालेकिल्लाच ताब्यात घेण्याचा अप्रत्यक्ष इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ‘अभी तो ये झाकी है, अगला स्टेशन बाकी है’ असं म्हणत दिला. ट्विटरवर काही क्लास नेते असले तरी हणमंत जगदाळे हे लोकांमधील नेते आहेत, अशी टीकाही त्यांनी नाव न घेता आव्हाड यांच्यावर केली. (Chief Minister Eknath Shinde's warning to MLA Jitendra Awhad)

मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाने ठाण्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडले आहे. राष्ट्रवादीच्या चार माजी नगरसेवकांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. हणमंत जगदाळे, सुधाबाई जाधवर, दिंगबर ठाकुर, वनिता घोंगरे या चार माजी नगरसेवकांसह दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण, परिवहनचे माजी सदस्य संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, माजी नगरसेवक संभाजी पंडीत, युवा पदाधिकारी प्रशांत जाधवर, संदीप घोगरे आदींनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Eknath Shinde-Jitendra Awhad
Thane BJP News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची निवडणूक मोर्चेबांधणी : मनसेचा विधानसभेचा उमेदवार; भीम अर्मीचा जिल्हाध्यक्ष गळाला

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, किसननगरनंतर लोकमान्य नगरच्या क्लस्टरचा विकास करण्यात येईल. माझा क्लस्टर हा अत्यंत जिव्हाळाचा विषय आहे. क्लस्टरच्या माध्यमातून ठाणे सुनियोजित शहर म्हणून उभं राहिलं आहे. हणमंत जगदाळे यांनी एका पक्षात ५० वर्षे काम केलं. जगदाळे यांनी सांगितलं की, मला काही नको. केवळ लोकमान्य नगरचा विकास अशी त्यांनी मागणी केली. असा कार्यकर्ता आपल्यासोबत असावा, असं मलाही वाटलं.

Eknath Shinde-Jitendra Awhad
Jitendra Awhad News : आव्हाडांना मुंब्र्यात घेरण्याची मुख्यमंत्र्यांची खेळी : राष्ट्रवादीचा ज्येष्ठ नेता गळाला; माजी नगरसेवक शिंदेंच्या कार्यक्रमाला

आयुष्यात मी बरेच मुख्यमंत्री बघितले आहेत. मात्र, एकनाथ शिंदे लोकांमधील मुख्यमंत्री आहेत. ठाण्याचे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना ताकद दिली पाहिजे, या भूमिकेतूनच आपण ही भूमिका घेतली आहे. किसननगर नंतर लोकमान्य नगर क्लस्टरला गती द्यावी, अशी मागणी हणमंत जगदाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Eknath Shinde-Jitendra Awhad
Sangola News : गणपतआबांच्या अंत्यविधीवेळी घडलेल्या प्रकाराबद्दल शेकाप नेत्याने मागितली जाहीर माफी

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची ‘मुंब्रा विकास आघाडी’

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मुंब्रा विकास आघाडी स्थापन करून जितेंद्र आव्हाड यांनाच आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाचा पाठिंबा या नगरसेवकांना असल्याचे सांगितले जात आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट हेात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com