Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe sarkarnama
पुणे

Lok Sabha Election: कोल्हेंच्या जाहीरनाम्यात माझ्या कामांचा उल्लेख, आढळराव पाटलांचा मोठा दावा

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe: "डॉ. अमोल कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडव हे गाव दत्तक घेतलं होतं त्या गावातही आमच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. त्यांना स्वतःचं काहीही दिसत नाही."

सागर आव्हाड

Shirur Lok Sabha Election 2024: शिरूर मतदारसंघातील जनतेचा माझ्यावर विश्वास असून 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 3 ते साडे तीन लाख मतांचं लीड मला मिळणार आहे. तसेच हडपसर मतदार संघातून कमीत कमी एक लाख मतांचं लीड मला मिळेल असा विश्वास शिरूरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी व्यक्त केला आहे.

तसेच अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) जाहीरनाम्यात मी केलेली विकास कामे असून, माझ्या कामावरच कोल्हे निवडून आले असल्याचा दावादेखील आढळराव पाटलांनी केला आहे. तर मतदारसंघातील कोल्हेंची कामेदेखील मलाच करावी लागतात असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने आढळराव पाटील पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून खाजगी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याबाबत आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याची खूप जास्त टंचाई निर्माण झाली आहे. आमच्या काही संस्था तसेच काही स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

कोल्हेंची कामेदेखील मलाच करावी लागतात

डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडव हे गाव दत्तक घेतलं होतं त्या गावातही आमच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. त्यांना स्वतःचं काहीही दिसत नाही, स्वतःचा तालुका, त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातही त्यांनी काही केलं नाही आणि ते राज्याचं काय सांगत आहेत, असं म्हणत आढळराव पाटलांनी कोल्हेंवर निशाणा साधला.

शिरूर मतदारसंघाच्या (Shirur Constituency) प्रचाराच्या संदर्भात विचारलं असता आढळराव पाटील म्हणाले, जे प्रकल्प पाच वर्षापूर्वी होते ते देखील आत्ता आहे त्याच परिस्थितीत आहेत. लोक सकाळपासून मला त्यांच्या अडीअडचणी सांगत असतात. मी खासदार नसतानादेखील काम करत आहे. कोल्हे यांचं कर्तव्यदेखील मलाच पार पाडाव लागत आहे, असंही आढळराव पाटील म्हणाले.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT