Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरायला मुख्यमंत्री अन्‌ दोन्ही उपमुख्यमंत्री येणार; सुळे-पवार 18 एप्रिलला अर्ज भरणार

Baramati, Pune, Shirur Lok Sabha Constituency : बारामतीतील प्रमुख लढत ही सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार अशीच होणार आहे. वंचित बहुजन आघाडीने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 19 एप्रिल आहे.
Sunetra Pawar-Supriya Sule
Sunetra Pawar-Supriya SuleSarkarnama

Baramati, 13 April : बारामतीत राज्यातील सर्वांत ‘हाय व्होल्टेज’ लढत रंगलेली आहे. नणंद-भावजयीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे, तर महायुतीकडून सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या या लढतीसाठी पवार आणि सुळे या दोघी येत्या गुरुवारी (ता. १८ एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज पुण्यात भरणार आहेत.

उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या बारामतीसोबतच (Baramati) पुणे (Pune) आणि शिरूर (shirur) या मतदारसंघाचे उमेदवारही अनुक्रमे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunetra Pawar-Supriya Sule
Mohite Patil News : भाजप सोडलेले मोहिते पाटील म्हणतात, ‘तुम्ही या, आम्हाला बोलायचं आहे’

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या तीन नेत्यांच्या उपस्थितीत महायुतीची पुण्यात जाहीर सभाही होणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याच्या गर्दीमुळे पुण्याचे राजकीय वातावरण तापणार आहे.

बारामतीतील प्रमुख लढत ही सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशीच होणार आहे. वंचित बहुजन आघाडीने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे इतर आणखी कोणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात का, हेही पाहावे लागणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 19 एप्रिल आहे.

Sunetra Pawar-Supriya Sule
Barmati Loksabha : सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर; शरद पवारांचा 'त्या' उल्लेखाने भावनिक

बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराचा धुराळा उडत आहेत. दोन्ही उमेदवारांकडून प्रचार सभा, कोपरासभा, प्रत्यक्ष गाठीभेटी, प्रत्यक्ष संवाद साधला जात आहे. तसेच, पत्रकवाटप, रॅली, पदयात्रांच्या माध्यमातून उमेदवार आपला प्रचार करत आहेत. दोन्ही गटांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर होताना दिसत आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोण कोणते स्टार प्रचारक बारामतीत सभा घेणार आहेत, याची प्रतीक्षा सर्वांना आहे. बारामतीतील प्रचाराची सांगता पाच मे रोजी होणार आहे. त्यामुळे येत्या २० दिवसांत मतदारसंघातील वातावरण ढवळून निघणार आहे.

R

Sunetra Pawar-Supriya Sule
Madha Lok Sabha : गुलालात माखलेले धैर्यशील यांचा फोटो ट्विट करत रणजितसिंहांनी फुंकले विजयाचे रणशिंग!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com