Shivajirao Adhalarao Patil Sarkarnama
पुणे

Shirur Lok Sabha Election: आढळरावांच्या पक्षप्रवेशाचा 'मुहूर्त' ठरला; उमेदवारी निश्चित पण...

Shirur Lok Sabha News: मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात उद्या (26 मार्च) दुपारी साडेतीन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश होणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Shivajirao Adhalrao Patil News: पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेच्या (Shirur Lok Sabha) उमेदवारीचा महायुतीतील तिढा अखेर सुटला आहे. माजी खासदार, शिवसेना उपनेते आणि एकनाथ शिंदेंचे शिलेदार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हेच या मतदारसंघातून उमेदवार असतील असे जवळपास ठरलं आहे. पण, ते शिवसेनेतून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी उद्या (26 मार्च) रोजी मंचर ता. आंबेगाव येथे अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

शिरूर मतदारसंघातच मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांच्या उपस्थितीत हा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. या कार्यक्रमाला त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यास कडाडून विरोध करणारे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील (Dilip Mohite-Patil) हे देखील हजर राहणार आहेत.

मोहिते-पाटील यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवारांनी भेट घेतली होती. आढळरावांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचे आणि उमेदवारीचे दार उघडले गेले होते. असाच विरोध शिरूरमधील इच्छुक आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही केला होता. तेसुद्धा उद्या हजर राहतात की नाही? याकडे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आढळरावांचे (Shivajirao Adhalrao Patil) कट्टर समर्थक जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, कामगार नेते इरफान सय्यद यांच्यासह मतदारसंघातील वरिष्ठ पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीत. मात्र,माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गिरे यांच्यासह आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उद्या राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधणार आहेत. गिरे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना ही माहिती दिली.

आढळरावांप्रमाणे शिरूरला आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची उमेदवारी निश्चित असून, फक्त त्याबाबतची अधिकृत घोषणा करणं बाकी आहे. काही जागांचा पेच युती तसेच आघाडीतही (MVA) असल्याने तेथील उमेदवार निश्चित झालेले नाहीत. मात्र, किमान शिरूरमध्ये आता हा प्रश्न मिटल्याचं बोललं जात आहे.

मात्र, राज्यात उरलेल्या इतर जागी येत्या तीन दिवसांत आपापले उमेदवार युती आणि आघाडीकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उद्याच्या कार्यक्रमात अजितदादा हे अमोल कोल्हेंवर पुन्हा तोफ डागण्याची शक्यता आहे. कारण 2019 ला त्यांनी विधानसभेला पुरंदरला शिवसेनेच्या विजय शिवतारेंचा (vijay Shivtare) पराभव केला होता, तसेच चॅलेंज त्यांनी या वेळी लोकसभेला शिरूरमधून कोल्हेंना दिले आहे. त्यामुळे दादांच्या चॅलेंजचे काय होते हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT