Shivajrao adhalrao Atul deshmukh dilip mohite  sarkarnama
पुणे

Shirur Loksabha News : खेडमध्ये राजीनामा भाजप नेत्याचा, प्रवेश राष्ट्रवादीत पण खळबळ शिवसेनेत!

Atul Deshmukh Join NCP Sharad Pawar : खेड तालुक्यातील भाजपचे माजी जिल्हा परिषदे सदस्य आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतुल देशमुखांच्या राजीनाम्याने शिरुर लोकसभेतील महायुतीच्या उमेदवाराला काहीसा धक्का तर आघाडीला दिलासा मिळाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

हरिदास कड-

Pune News: भाजपचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खेड-आळंदी विधानसभेचे निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकला.त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीसाठी हा मोठा धक्का आहे तर दुसरीकडे देशमुखांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं बळ मिळालं आहे. पण देशमुख यांच्यामुळे लोकसभेचे (Shirur loksabha) राजकीय समीकरण आता बदलले आहे.

खेड तालुक्यातील भाजपचे माजी जिल्हा परिषदे सदस्य आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतुल देशमुखांच्या राजीनाम्याने शिरुर लोकसभेतील महायुतीच्या उमेदवाराला काहीसा धक्का तर आघाडीला दिलासा मिळाला आहे.देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केल्याने खेड तालुका उबाठा शिवसेनेत जोराची खळबळ उडाली आहे.

लोकसभेच्या निवडणुका सध्या होत असल्याने विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे.खेडची विधानसभेची जागा ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना गटासाठी आहे.भाजपचे अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या विधानसभेच्या जागेवर दावा सांगेल. उमेदवारीचा शब्द देशमुखांना ज्येष्ठ नेते शरद पवार, अमोल कोल्हे यांच्याकडुन मिळाला आहे का? त्यामुळे देशमुखांचा प्रवेश विधानसभेच्या अगोदर या जागेवर दावा सांगण्यासाठी आहे का व त्यांची उमेदवारी निश्चित केली जात आहे का असे विविध प्रश्न निर्माण झाल्याने उबाठा शिवसेना गटामध्ये खेड तालुक्यात तर्क- वितर्कांना उधाण आले आहे.

अतुल देशमुख यांनी खेड तालुक्यात यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढविली आहे. त्यांनी निवडणूक आमदार दिलीप मोहिते पाटील आणि स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांच्या विरोधात लढवली होती. देशमुख यांना अपक्ष असताना 55 हजार मते पडली होती. देशमुख यांचा 2024 ची खेड विधानसभा निवडणूक पुन्हा लढविण्याचा व पराभवाचा वचपा काढण्याचा कल आहे. त्यामुळे त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे अशी जोरदार चर्चा आहे. विधानसभेच्या जागेवर देशमुख दावा सांगतील. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता वाढली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारातही न जाता जोपर्यंत विधानसभेची जागा शिवसेना गटाला मिळत नाही हे स्पष्टीकरण वरिष्ठाकडून होत नाही तोपर्यंत खासदार कोल्ह्यांचा प्रचार करणार नाही असाही काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा होरा आहे. परंतु प्रमुख पदाधिकारी मात्र खासदार कोल्हे यांचा प्रचार थांबलेला नाही, आम्ही प्रचार करत आहोत हे सांगत आहेत.

अतुल देशमुख (Atul Deshmukh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे. देशमुख हे 2024 ची विधानसभेची निवडणूक लढविणार आहे हे मात्र नक्की आहे . शिवसेनेत ही अनेकजणांनी आमदारकीची स्वप्न पाहिलेली आहेत.यामध्ये अशोक खांडेभराड, बाबाजी काळे, अमोल पवार, शिवाजी वर्पे, रामदास धनवटे, राहुल गोरे हे ही विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

विधानसभेची खेडची जागा ही शिवसेनेची आहे.त्यामुळे ही जागा शिवसेना सोडणार नाही यावर शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते मात्र ठाम आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत नक्की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाकडे जाते की उबाठा शिवसेनेकडे राहते हे मात्र पाहणे उत्सुक्याचे आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT