Pune News, 17 Feb : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गुरुवारी, १९ फेब्रुवारीला साजरी होत असताना मिरवणूक मार्गावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे शिवभक्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मिरवणूक मार्गात बदल करा असे आदेश नवनिर्वाचित महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
शिवाजी महाराज जयंती निमित्त भवानी माता मंदिर ते शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणुका काढल्या जातात. यावेळी ढोलताशे पथक, शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक केली जातात.
तसेच या मिरवणुकीत सरदारांची घराणेही सहभागी होतात. त्यामुळे या शिवजयंती महोत्सवाला विशेष महत्त्व आहे. महापालिकेच्या पथ विभागाने भवानी पेठेतील दुल्हा-दुल्हन कब्रस्तान पदमजी पोलिस चौकी ते रोशन मशिदी समोरील रस्ता सिमेंट काँक्रिटने तयार केला जात आहे.
हे काम वेगात सुरु असले तरी हे काम पूर्ण झाल्यानंतर तेथे क्युरिंग करावे लागणार आहे. त्यामुळे हे काम १९ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होऊ शकणार नाही. पदमजी गेट ते रोशन मशीद या मार्गावर काम सुरु असल्याने शिवजयंती महोत्सवानिमित्ताने मिरवणूक काढणे अडचणीचे ठरणार आहे.
त्यामुळे मार्ग बदलण्याबाबत कार्यवाही करावी असे पत्र पथ विभागाने महापौर नागपुरे यांच्याकडे दिले होते. त्यावर आज महापौर यांनी मिरवणुकीत सहभागी होणारे रथ, नागरिक यांची गैरसोय टाळण्यासाठी मिरवणूक मार्गात बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
मिरवणूक मार्गात बदल केल्यानंतर तो मार्ग पुढील प्रमाणे असणार आहे.
श्री भवानी माता मंदिर- श्री भवानी माता चौक- बनकर तालीम-रामोशी गेट-श्री सूर्यमुखी सिद्धिविनायक मंदिर चौक- ए.डी.कॅम्प चौक-संत कबीर चौक-लक्ष्मी रस्त्याने सोन्या मारुती चौक-फडके हौद-लाल महा- नवग्रह मंदिर- शनिवारवाडा- शिवाजी महाराज पुतळा, एसएसपीएमएस.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.