Kharadi Anti-Encroachment: खराडीतली अतिक्रमणविरोधी कारवाई फेक? बिल्डरचा भूखंड मोकळा करण्यासाठी महापालिकेनं कारवाई केल्याची माहिती

Kharadi Anti-Encroachment: महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठा फौजफाटा घेऊन खराडीत एक मोठी अतिक्रमण कारवाई करून तब्बल १ लाख ८५ चौरस फुटावर बुलडोझर चढवला होता.
PMC Election 2026
PMC Sarkarnama
Published on
Updated on

Kharadi Anti-Encroachment: महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठा फौजफाटा घेऊन खराडीत एक मोठी अतिक्रमण कारवाई करून तब्बल १ लाख ८५ चौरस फुटावर बुलडोझर चढवला होता. मात्र, आता या कारवाईवरून संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाच्या जागेवरील अतिक्रमण काढून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लावली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. दरम्यान याबाबत आयुक्त नवल किशोर राम यांनी चौकशी करून कारवाई करू असे स्पष्टीकरण दिले आहे.

PMC Election 2026
Mhada : मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! म्हाडानं स्थगित केलेल्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावरील घरांसाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरु

शहरात रस्ते, पादचारी मार्ग इमारतींचे फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन येथे प्रचंड अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर जुजबी कारवाई केली जाते. पण गेल्या आठवड्यात अतिक्रमण विभागाने पहाटे पाच वाजल्यापासून खराडीतील एका मोठ्या भूखंडावर कारवाई केली. १ लाख ८५ हजार चौरस फूटावरील कच्चे-पक्के शेड, बांधकाम पाडून टाकले. एवढी मोठी कारवाई केल्याने कौतुक होत असताना आता त्याबाबत प्रशासनात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.

PMC Election 2026
Tushar Bhosle: "सत्तारांनी हिंदु धर्म स्वीकारलाए का? नसेल तर बाहेरुनच दर्शन घ्यायला हवं होतं"; भाजपच्या तुषार भोसलेंची मुक्ताफळं

हा खासगी भूखंड एका बांधकाम व्यावसायिकाने विकत घेतला. पण तेथील अतिक्रमणे निघत नसल्याने महापालिकेशी संपर्क केला. वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हालल्यानंतर महापौर-उपमहापौर निवडणुकीच्या दिवशी सकाळी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

PMC Election 2026
Pune Congress Bhavan: महापौर मंजुषा नागपुरेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस हायकोर्टात जाणार; पहिला दगड कोणी भिरकावला? याचाही फैसला तिथंच होणार

या कारवाईबाबत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम म्हणाले, ‘‘खराडीत भारत माता नावाने अनधिकृत मार्केट सुरू असल्याची तक्रार आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पण खासगी व्यक्तीची जागा रिकामी करून देण्यासाठी ही कारवाई असेल तर त्याची माहिती घेऊन कारवाई केली जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com