Devendra Fadnavis, Bhaskar Jadhav Sarkarnama
पुणे

Bhaskar Jadhav : 'टरबुज्या..अनाजीपंत...'; फडणवीसांवर हल्लाबोल करताना भास्कर जाधवांना भानच राहिलं नाही

Jagdish Patil

Pune News, 03 August : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेश कला-क्रीडा मंदिरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे.

राज्यात सध्या नरेटिव्ह नरेटिव्ह खूप गाजतंय आहे. नरेटिव्ह म्हणजे काय तर खोटं पसरवणं. राज्यात सर्वात जास्त खोटं कोण पसरवत असले तर तो देवेंद्र फडणवीस आहे, टरबुज्या आहे, हा अनाजीपंत आहे, अशा शब्दात जाधव यांनी टीका केली.

ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना एकमेकांबाबतच्या तक्रारी कमी करा आणि सहकार्य मोठ्या प्रमाणात करा. तसंच प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं रहा. दुसऱ्याच्या बॅनवर माझा फोटो का नाही? अशी तक्रार करण्यापेक्षा स्वत: बॅनर लावा.

आपल्या सहकार्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला.ज्या पदाधिकाऱ्याला काम करायाचं असेल तर त्याला मदत करण्याची जबाबदारी आपली आहे. त्याला काही घरगुती अडचण असेल तर त्याला मदत करा, अशा सूचना दिल्या.

दरम्यान, याचवेळी त्यांनी भाजप (BJP) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले, "राज्यात सध्या नरेटिव्ह नरेटिव्ह खूप गाजतंय आहे. नरेटिव्ह म्हणजे काय तर खोटं पसरवणं. राज्यात सर्वात जास्त खोटं कोण पसरवत असले तर, तो देवेंद्र फडणवीस आहे, टरबुज्या आहे, हा अनाजीपंत आहे."

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी उद्धव ठाकरेंनी मुख्यंमत्री असताना मंजूर केले होते. त्यावेळी सभागृहा बोलताना मी म्हटलं होतं की, त्या काळात अनाजीपंत सोमाजीपंत असतील त्यांनी संभाजी महाराजांचा छळ केला होता. तो आजही संपलेला नाही.

या सभागृहात आजच्या युगातला अनाजीपंत बसला आहे. या राज्याची संस्कृती कोणी खराब केली असेल तर या टरबुज्याने केली आहे, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली. मात्र, जाधव यांना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यावर बोलताना भान राहिलं नव्हतं का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT