Shivsena UBT News Sarkarnama
पुणे

Shivsena UBT News : चंद्रकांत पाटलांच्या विरोधात कोथरूडमधून सेनेचा उमेदवार ठरला; 'हा' माजी आमदार निवडणूक रिंगणात

Political News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून कोथरूड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेने देखील किशोर शिंदे यांना यंदा पुन्हा एकदा कोथरूडच्या मैदानात उतरवला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरूडमधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार ठरला आहे. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला असून आता कोथरूडमध्ये तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून कोथरूड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेने देखील किशोर शिंदे यांना यंदा पुन्हा एकदा कोथरूडच्या मैदानात उतरवला आहे. महाविकास आघाडीकडून कोथरूडमधील उमेदवार कोण असणार याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम होता. हा सस्पेन्स अखेर संपला आहे. ( Shivsena UBT News)

कोथरूडमधून शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना निवडणूक लढण्यासाठी एबी फॉर्म देण्यात आला. त्यांनी मातोश्रीवरती जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म स्वीकारला असल्याचे समोर आले आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना ठाकरे गटाला सुटेल हे जवळपास निश्चित मानला जात होते. या मतदारसंघात चंद्रकांत मोकाटे यांच्यासह महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते. तसेच दरम्यानच्या काळात भाजपचे नाराज असलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे देखील मशाल हातात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता या सगळ्या शक्यतांना पूर्णविराम लागला आहे

याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत मोकाटे (Chandraknt Mokate) म्हणाले, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपली सेवा करण्यासाठी शिवसेना महाविकास आघाडीकडून कोथरूड मतदारसंघातून मला अधिकृत उमेदवारी दिली आहे. आपल्या सर्वांचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी मी कटीबद्ध राहील, असा आपणास विश्वास देतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT