Shivsena UBT Candidate list : उद्धव ठाकरेंनी मोठं धाडस दाखवलं, तिसरी उमेदवार यादी जाहीर; 'या' मतदारसंघात दिला मुस्लिम चेहरा

Assembly Election Shivsena UBT Third Candidate list: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT Candidate list : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून वर्सोवा मतदारसंघातून हरुन खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव, विलेपार्ले मतदारसंघातून संदीप नाईक यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून हरून खान यांना उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नाजी नगरसेवक राजू पेडणेकर हे नाराज असल्याची माहिती आहे. पेडणेकर या मतदारसंघातून लढण्यास उच्छुक होते. पेडणेकर आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पेडणेकर यांची उमेदवारी ही उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो आहे.

Shivsena UBT News
Dhanajay Mahadik News : पुत्रासाठी महाडिकांनी डाव टाकला, पण महायुतीत फाटले !

आज जाहीर झालेले उद्धव ठाकरेंचे उमेदवार

वर्सोवा - हरून खान

घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव

विलेपार्ले - संदीप नाईक

शिवडीमधून अजय चौधरी

धुळे शहर-अनिल गोटे

चोपडा-राजू तडवी

जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन

बुलढाणा-जयश्री शेळके

दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल

हिंगोली-रूपाली राजेश पाटील

परतूर-आसाराम बोराडे

देवळाली-योगेश घोलप

कल्याण पश्चिम-सचिन बासरे

कल्याण पूर्व-धनंजय बोडारे

वडाळा-श्रद्धा श्रीधर जाधव

भायखळा-मनोज जामसुतकर

श्रीगोंदा-अनुराधा राजेंद्र नागावडे

कणकवली- संदेश भास्कर पारकर

Shivsena UBT News
Amit Thackeray Interview: 'माहिम'मधून मनसेची उमेदवारी जाहीर झालेल्या अमित ठाकरेंनी आपलं पुढचं ध्येयही सांगून टाकलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com