Sanjay Shirsat Ravindra Dhangekar sarkarnama
पुणे

Sanjay Shirsat V/S Ravindra Dhangekar : काँग्रेसच्या धंगेकरांनी स्टंटबाजी थांबवावी, शिवसेनेच्या शिरसाट यांनी फटकारले...

Pradeep Pendhare

Pune Car Accident : पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर राजकीय स्टंट करत असल्याचा आरोप शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आमदार संजय शिरसाट यांनी केला. अपघातातील मृत झालेल्या मुलांच्या नातेवाईकांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असा सल्ला देखील संजय शिरसाट यांनी दिला.

या अपघात प्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची सुरूवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे अपघातामागील बऱ्याच गोष्टी समोर आल्याची पुणेकरांची भावना आहे. आमदार धंगेकर यांनी काल पुणे पोलिस (Pune Police) आयुक्तालयासमोर काल धरणे आंदोलन केले. याप्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केला असून, पैसे घेऊन प्रकरण हाताळल्याचा आरोप केला. अपघात करणारा विशाल अगरवाल याच्या मुलाचा पुढे वरिष्ठ न्यायालयाने जामीन रद्द करून बालसुधारगृहात पाठवले. तसेच विशाल अगरवाल याला अटक केली. तसेच विशालचे वडील सुरेंद्र अगरवाल याने पोर्शे कारच्या चालकाचे अपहरण करून डांबून ठेवल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. सध्या अगरवालच्या तिन्ही पिढ्या सध्या तुरुंगात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दोघा आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अल्पवयीन मुलगा कार घेऊन पळून (Pune Hit And Run Case) चालला होता. या अपघातात मुलाला लगेचच जामीन झाला. यावर पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली. या अपघातात आता वेगवेगळे पैलू समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे. Shiv Senas Sanjay Shirsat rebuked Congress MLA Ravindra Dhangekar over the accident in Pune

दरम्यान, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील अपघाताची गंभीर दखल घेऊ पुणे पोलिस आयुक्तालयात बैठक घेत कारवाईच्या सूचना दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रकरणी कोणी राजकारण करू नये, असे फटकारले होते. त्यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट यांनी रवींद्र धंगेकर यांना सुनावले आहे. या प्रकरणात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर राजकीय स्टंटबाजी करत आहेत. आता त्यांनी ती थांबवावी. अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना न्याय कसा मिळेल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असा टोला संजय शिरसाट यांनी धंगेकरांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT