Pune Porsche Car Accident : कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून आमदार बच्चू कडूंचा 'प्रहार'; म्हणाले घरात पैसा..!

Pune Hit and Run Case : या अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करत त्याला 14 दिवस बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर संबधित मुलाचे वडील, आजोबा यांच्यासह या अपघात प्रकरणाशी संबंधित व्यक्तीची चौकशी सुरू असून वडीलांना आणि आजोबांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली...
Bacchu Kadu Pune Car Accident
Bacchu Kadu Pune Car Accident Sarkarnama

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कारच्या झालेल्या अपघातामध्ये दोन अभियंत्यांना जीव गमवावा लागला. पबमधून दारूची पार्टी करून आलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवून हा अपघात केला.

या प्रकरणात अवघ्या 15 तासातच कोर्टाने जामीन दिल्याने याची मोठी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. त्यातच अल्पवयीन आरोपी हा बिल्डरचा मुलगा असल्याने पोलिसांनी त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप देखील केला जातोय. या भीषण अपघाताची चर्चा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सुरू होती. या प्रकरणात पोलिस खात्याची बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालत कडक कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bacchu Kadu Pune Car Accident
Pune Hit and Run Case : मोठी बातमी..! 'हिट अ‍ॅन्ड रन' प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांना अटक, कारण...

त्यानंतर बालहक्क न्यायमंडळकडे या अल्पवयीन मुलाला दिलेल्या जामीनावर फेरविचार अर्ज पोलिसांनी दाखल केला होता. यावर सुनावणी झाली. त्यामध्ये या प्रकरणावरून वाढता जनप्रक्षोभ लक्षात घेत न्याय मंडळाने या अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करत त्याला 14 दिवस बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर संबधित मुलाचे वडील, आजोबा यांच्यासह या अपघात प्रकरणाशी संबंधित व्यक्तीची चौकशी पोलिसांनी (POLICE ) सुरू केली आहे.

कल्याणीनगर येथे झालेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह च्या प्रकरणावर माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ज्यांच्याकडे पैसा आहे, असा वर्ग डान्स बार, पब यामध्ये जातो, असे लक्षात आले आहे. शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरले आहेत. या सर्वांवर बंधने तरी कशी येणार ? कारण अधिकारी आणि नेत्यांना त्याचे काहीच पडलेले नाही. 'ज्याचे श्रम कमी त्याला पगार जास्त आणि ज्याचे श्रम जास्त त्याला पगार कमी' अशी परिस्थिती सर्वत्र असल्याचे वास्तव मांडत कडू यांनी वास्तवाची जाणीव यानिमित्ताने सर्वांना करून दिली आहे. घरात पैसा जास्त झाला की, असे प्रकार घडणार, असेही कडू म्हणाले.

Bacchu Kadu Pune Car Accident
Ujani Dam News : उजनीच्या अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय !

दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टाने (court ) शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी निलंबन करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. हा गंभीर अपघात झाल्यानंतर या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कंट्रोल रूम बरोबर संपर्क नाही केला. तसेच नाईट राऊंडचे पोलीस उपायुक्त यांना देखील याची कोणतीही माहिती दिली नाही, त्यामुळे हे निलंबन करण्यात आले आहे.

Bacchu Kadu Pune Car Accident
Chhagan Bhujbal News : अमित शाहांची पसंती तरी भुजबळांना का नाही मिळाली उमेदवारी? मोठं कारण आलं समोर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com