Pune Hit And Run Case : पुणे अपघातप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Pune Crime news : विशाल अगरवाल यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तीन दिवसाच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर विशाल अगरवाल यांना कोर्टासमोर हजर केले
Pune Hit And Run Case
Pune Hit And Run CaseSarkarnama

Pune News : पुण्यातील कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली.यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांच्या जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकारण तापलं असून पोलिसांनी कारवाईत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.आता या घटनेतील आरोपी विशाल अगरवालला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

विशाल अगरवाल ( Vishal Agarwal) यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तीन दिवसाच्या पोलिस कोठडीची (Police Custody) मुदत शुक्रवारी संपल्यानंतर विशाल अगरवाल यांना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली आहे. (Pune Hit And Run Case)

Pune Hit And Run Case
Gajanan Kirtikar News : शिंदेंची डोकेदुखी वाढली; शिलेदारांमध्ये जुंपली; कीर्तिकरांमुळे महायुतीतील वातावरण तापले

दरम्यान, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातामधील 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीचे विशाल अगरवाल हे वडील आहेत. त्यांनीच आपल्या अल्पवयीन मुलाला पार्टी करण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्यासाठी पोर्श गाडी दिली होती.

याच गाडीने अपघात झाला होता. विशाल अगरवाल ( Vishal Agarwal ) यांच्या अल्पवयीन मुलाने मद्य पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवून एका दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की यात दुचाकीवरून चाललेल्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

मुलगा अल्पवयीन असताना देखील त्याला गाडी आणि हॉटेलमध्ये जाऊन मद्य पिण्याची परवानगी दिल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दखल करून त्यांना अटक केली आहे. त्यांची सध्या चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणात विशाल अगरवाल यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तीन दिवसाच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर विशाल अगरवालला यांना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालायीन कोठडी कोर्टाने सुनावली आहे.

दरम्यान, विशाल अगरवालने ड्रायव्हरला हा अपघात ज्यावेळेस झाला त्यावेळी अल्पवयीन मुलगा नव्हे, तर मी गाडी चालवत होतो, असं पोलिसांना खोटं सांग असं सांगितल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Pune Hit And Run Case
Pune Hit And Run Case : पुणे अपघातप्रकरणी मोठी अपडेट; आरोपी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com