Sanjay Raut-Vaibhav Wagh
Sanjay Raut-Vaibhav Wagh Sarkarnama
पुणे

पुणे-पिंपरीसाठी शिवसेनेचे ‘वाघ’ समन्वयाचे काम पाहणार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभारी समन्वयक म्हणून वैभव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वपूर्ण आहे. शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी वाघ यांच्या नियुक्ती जाहीर केली आहे.

वैभव वाघ गेल्या २० वर्षांपासून संघटनात्मक व सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. वंदे मातरम संघटना तसेच गणेशोत्सव मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, युवक संघटन क्षेत्रात मोठे काम उभारले आहे. या कामांमुळे युवा वर्गात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणूनही त्यांचा दांडगा अनुभव आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा अशा तब्बल १११ पेक्षा अधिक निवडणुकांचे रणनीतीकार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि निवडणूक व्यवस्थापनेचे कौशल्य शिवसेनेला येत्या काळात उपयोगी पडू शकते. कोरोना काळात वाघ यांनी गरजूंसाठी देशभर केलेले कार्य, ‘प्लाझ्मा प्रीमियर लीग’ सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम, कोरोना मृतांच्या अंत्यविधी कामातील सहभाग अशा उल्लेखनीय कामासाठी वाघ यांना देशभरातून 'हेल्थगिरी अवॉर्ड'चे तिसरे नामांकन मिळाले होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून वाघ यांनी वंदे मातरम संघटनेला राज्यभर विस्तारले आहे.

शिवसेनेने प्रभारी समन्वयकपदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल आनंद व्यक्त करत वैभव वाघ म्हणाले, ‘‘ हे केवळ पद नाही, तर जबाबदारी आहे. ही संधी दिल्याबाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आणि शिवसेना उपनेते सचिन आहिर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर या सर्वांचे आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनाने आगामी काळात पक्षासाठी भरीव काम करण्याचा विश्वास व्यक्त करतो."

पुणे, पिंपरी-चिंचवडचे सर्व सन्माननीय शहरप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसेना परिवारातील प्रत्येक शिवसैनिक ह्यांच्या सोबत समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचत विकासाभिमुख आणि दूरगामी काम करण्याचा संकल्प आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची कार्यपद्धती सार्थ करत आम्ही सगळे चांगले काम उभे करत राहू ह्याची खात्री देतो, असे वाघ यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT