पुणे : राज्यभरातील निवडणुकांच्या रणसंग्रामाआधीच राजकारण्यांसाठी 'सरकारनामा'चा 'क्रिकेटनामा' हा संग्राम आजपासून (शनिवार) पुण्यात सुरु होत आहे. यात अव्वल ठरण्यासाठी शिवसेनेनेही कंबर कसली आहे. त्यातून पुण्यातील शिवसैनिकांचा ‘परफॉर्म' वाढवून क्रिकेटनामाच्या (cricketnama) ‘ट्रॉफी'वर शिवसेनेचे नाव कोरण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सर्वेसर्वा, शिवसेनेचे सचिव मिलिंद नावर्केर (Milind Narvekar) आता थेट मैदानात उतरणार आहेत.
या क्रिकेट सामान्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि मनसेच्या संघांना पराभूत करून मैदान गाजविण्याचा नार्वेकरांचा इरादा आहे. नावर्केरांसह खासदार ओमराजे निंबाळकर, धैर्यशिल माने, माजी मंत्री सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, चंद्रकांत मोकाटे, नाना भानगिरे, पृथ्वीराज सुतार, किरण साळी, समीर तुपे विजयासाठी लढणार आहेत. (Sarkarnama cricketnama matches in Pune)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या चर्चेनेच राजकीय माहोल तयार होत आहे. अशातच राजकारण्यांचे आकर्षण ठरलेल्या 'सरकारनामा'च्या वतीने 'क्रिकेटनामा' म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. राजकारणीच नव्हे तर आयपीएस आणि आयएएसही या स्पर्धेत खेळणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्यासह साऱ्याच राजकीय पक्षांचे नेते मैदानात उतरणार आहे. विशेषतः क्रिकेटच्या मैदानावरही शिवसेनेला पहिला क्रमांक राहण्यासाठी नावर्केर हे स्वतः सज्ज झाले आहेत. राज्यात सत्ता आल्यापासून पुण्यासह राज्यभरात शिवसेना मजबूत करण्याचा पक्षनेतृत्वाचा प्रयत्न आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या क्रिकेट सामान्यातही सत्तेच्या राजकीय पक्ष एकमेकांच्या समोर येणार आहेत.
गेल्या काही दिवसांत पुण्यातील शिवसैनिकांमधील उत्साह वाढला आहे. त्यामुळे 'सरकारनामा'च्या या स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी नार्वेकरांची टीम प्रयत्न करणार आहे. नार्वेकर हे मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेतील चाणक्य मानले जातात; राजकीय पटलासह मैदानावरच्या डावपेचांत नार्वेकर हे तरबेज मानले जातात. त्यामुळे 'क्रिकेटनामा'चे मानकरी ठरून पुण्यातील शिवसैनिकांमधील उत्साहात भर घालण्यासाठी नार्वेकर हे नेमके कोणते डाव टाकणार आणि जिंकणार ? याची चर्चा वर्तुळात आहे.
प्रशासकीय वर्तुळातही 'क्रिकेटनामा'ची उत्सुकता
या सामन्यामुळे राजकीय नव्हे तर राज्याच्या प्रशासकीय वर्तुळातही 'क्रिकेटनामा'ची उत्सुकता शिगेला पोचली आहे. राज्यपातळीवरील आपापल्या पक्षाच्या संघांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनीही वातावरण निर्माण केले आहे.
`सनी`ज वर्ल्ड
पुण्यातील `सनी`ज वर्ल्ड`येथे या स्पर्धा होणार आहेत धनंजय मुंडे आणि गोपीचंद पडळकर या दोघांनाही क्रिकेटची आवड आहे. त्यामुळे या दोघांतील सामना कसा रंगणार याची उत्सुकता आहे. या सामान्यांचे समालोचनही राजकीय नेतेच स्वतः करणार असल्याने ती फटकेबाजी देखील चांगलीच रंगणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.