Ajit Pawar| Murlidhar Mohol Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : "पालकमंत्री अजितदादा अन् केंद्रीय मंत्री मुरलीअण्णांमध्ये तरी समन्वय आहे का?"

Akshay Sabale

Maharashtra Political News : पुण्यात अतिवृष्टीनंतर मुळा-मुठा नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. यानंतर पालकमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीअण्णा मोहोळ विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.

याच प्रकरणावरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार सचिन अहिर यांनी अजितदादा आणि मुरलीअण्णांवर टीका केली आहे. पालकमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांमध्ये तरी समन्वय आहे का? असा सवाल सचिन अहिर यांनी उपस्थित केला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

सचिन अहिर (Sachin Ahir) म्हणाले, "पुण्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती आणि नागरिकांचे हाल याला सर्वस्वी सत्ताधारी जबाबदार आहेत. राज्यातले आणि केंद्रातले सत्ताधारी दोघेही पूरपरिस्थिती महापालिकेमुळे निर्माण झाली, असं म्हणत आहे. मग, याला नेमकं जबाबदार कोण?"

"उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar ) हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. मुरलीधर मोहोळ हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. ते महापौर राहिलेले आहेत. सत्ता त्यांची आहे. तरीदेखील ते महापालिका आणि जलसंपदामध्ये समन्वय नसल्यानं ही पुराची आपत्ती ओढावली असे जर म्हणत असतील, तर हे पुण्याचे दुर्दैव आहे. पालकमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांमध्ये तरी समन्वय आहे का?" असा प्रश्न सचिन अहिर यांनी उपस्थित केला.

"पालकमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री हे पुण्यात महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठका घेतात आणि अपयश मात्र महापालिकेवर ढकलतात. प्रत्यक्षात हे सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं पुण्यातील अनेक योजनांचा निधी बाजूला ठेवून नदी सुधार योजनेसाठी पैसा दिला. तरीदेखील पूर आपत्ती आली," याकडे सचिन अहिर यांनी लक्ष वेधले.

"तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नदी सुधार योजनेत नदीचे पात्र अरूंद होत आहे, म्हणून या कामाला स्थगिती दिली होती. राज्यातील सत्ताबदलानंतर ही स्थगिती कोणी उठवली आणि पुणेकरांना पुराच्या खाईत कोणी लोटले, याचादेखील विचार व्हायला हवा," असं सचिन अहिर यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT