Vikram Kumar - Prashant Waghamre - Nitesh Rane  Sarkarnama
पुणे

PMC News : नितेश राणेंकडून आयुक्त विक्रम कुमार, प्रशांत वाघमारेंचा एकेरी उल्लेख, २४ तासातच अधिकाऱ्याचंही रोखठोक प्रत्युत्तर

Deepak Kulkarni

Pune : पुण्यातील पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमणाविरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी त्यांना दिलेले काम करावे. नाहीतर त्यांची खुर्ची खेचायला वेळ लागणार नाही. आत घुसलो तर अधिकार्‍यांना कुठे पळायचं कळणार नाही. पुन्हा महापालिका आयुक्तांना ‘लव्हलेटर’ पाठवणार नाही. फक्त तारीख जाहीर करू, मग इतिहास घडविण्यासाठी तयार राहा असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

कसबा पेठ भागातील पुण्येश्वर मंदिर मुक्तीसाठी हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने महापालिकेच्या बाहेर झालेल्या आंदोलनात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार(Vikram Kumar), नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांचा एकेरी उल्लेख करत वैयक्तिक पातळीवर जाऊन देखील टीका केली होती. राणेंच्या याच टीकेला आता पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी महापालिका नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. त्याचा निषेध करत मंगळवारी पुणे महापालिकेत अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने काळ्या फिती बांधुन आंदोलन केले.

प्रशांत वाघमारे म्हणाले, पुणे महापालिके(Pune Municipal Corporation) समोर पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. महापालिकेडून यापूर्वी कारवाई देखील केली आहे.

मात्र, सोमवारी झालेल्या आंदोलनादरम्यान पालिकेच्या अधिकार्‍यांबद्दल जी भाषा वापरली गेली आहे. ती योग्य नसून या शहरामध्ये आम्ही अनेक वर्षांपासून अधिकारी म्हणून काम करत आहे. एका रात्रीमध्ये शहरात विकास झाला नाही. तर अनेक वर्ष काम केल्यानंतर शहर प्रगती पथावर गेले आहे. त्यामुळे अधिकारी असो वा अन्य कर्मचारी या कोणत्याही व्यक्ती बद्दल योग्य भाषा वापरली पाहिजे असे खडे बोल भाजप नेत्यांना सुनावले आहेत.

पुणे महापालिका प्रशासन आणि महापालिका अधिकार्‍यांच्याविषयी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांकडून पालिकेच्या इमारतीसमोर आंदोलन करण्यात आले. तसेच पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्याचेही माहिती समोर येत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT