Deepak Kesarkar News : शिक्षक दिनाच्या दिवशीच शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन ; ठाकरे गटाने केली 'ही' मागणी

Sindhurdurg : '' रखडलेली शिक्षक भरती ताबडतोब करा आणि शिक्षणाचा बट्ट्याबोळ थांबवा...''
Deepak kesarkar, uddhav thackeray Latest News
Deepak kesarkar, uddhav thackeray Latest Newssarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg : कोकणासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे मराठी प्राथमिक शाळा ओस पडल्या आहेत. तात्पुरत्या स्वरुपातल्या निवृत्त शिक्षक भरतीलाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरती महिन्याभरात केली जाईल असं आश्वासन विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिलं होतं. मात्र, शाळा सुरू होऊन दोन अडीच महिने होत आले तरीही शिक्षक भरती झालेली नसल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवासेनेनं केसरकरांच्या घरासमोरच आंदोलन करण्यात आलं.

युवासेना ठाकरे गटाने शिक्षक दिनाचं निमित्त साधत शिक्षण मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांच्या सावंतवाडीतल्या घरासमोर निषेध आंदोलन केलं. रखडलेली शिक्षक भरती ताबडतोब करा आणि शिक्षणाचा बट्ट्याबोळ थांबवा, अन्यथा राजीनामा द्या अशा मागण्या ठाकरे गटाच्या आंदोलकानी केल्या. पोलिसांनी या आंदोलकांना तातडीने ताब्यात घेतलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

Deepak kesarkar, uddhav thackeray Latest News
Udayanraje Bhosale News : मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी आरक्षण का दिले नाही ? उदयनराजेंचा सवाल ; जरांगेंवर उपोषणाची वेळ आली नसती..

रुची राऊत यांची एन्ट्री

विशेष म्हणजे या आंदोलनात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांची कन्या रुची या देखील सहभागी झाल्या. युवती सेना समन्वयक म्हणून काम सुरु केलेल्या रुची राऊत यांचं हे रस्त्यावर उतरुन केलेलं पहिलंच आंदोलन आहे. केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री(Kolhapur) असल्यामुळे ते त्याच जिल्ह्यात जास्त असतात. पण इकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांनी कोकणातल्या बेरोजगार तरुणांचे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत असा आरोपही रुची राऊत यांनी यावेळी केला.

काय आहे प्रकरण...?

बिंदू नामावली आणि संच मान्यतेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतर शिक्षक भरतीबाबतचे संकेतस्थळ सुरू होईल. ऑक्टोबर अखेर पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांना नियुक्ती आदेश दिले जातील असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते.

राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर केसरकर यांनी १५ ऑगस्टपासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल अशी घोषणा केली होती.

Deepak kesarkar, uddhav thackeray Latest News
CMO Dummy OSD News : मुख्यमंत्री शिंदेंसह अधिकाऱ्यांनाही 'या' ठाकरेंचा चकवा; डमी 'ओएसडी' होऊन हाकला CMO चा कारभार !

राज्यात शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पदे शासन भरत नसल्याने रिक्त जागांचा आकडा दरवर्षी वाढत असतो, काही जागा समायोजन प्रकियेने भरण्यात येत असल्या तरी रिक्त जागांचा अनुशेष भरून निघत नसल्याने याचा विपरित परिणाम या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com